मुंबईच्या महत्वाच्या ठिकाणांना परदेशी नावे का आहेत?

मुंबईत बऱ्याच ठिकाणांची नावे ही परदेशी का आहेत? उदा. सांताक्रूझ, बँड्रा, विलेपार्ले, कोलाबा, कफ परेड, वर्सोवा, इ‌. त्यांची नावे अशी का ठेवली?

जर तुम्ही मुंबईचा इतिहास पाहिलात तर तुम्हाला कळेल की इथे एकेकाळी कोळी राजा भीमदेव ह्यांचे राज्य होते. त्यांची राजधानी माहीम येथे होती आणि राज्य सायन पर्यंत पसरले होते. म्हणून सायनचे मराठी नाव शीव आहे — कारण ते शीवेवर (सीमेवर) होते.

नंतर मुंबई गुजरात सल्तनत ने स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यांना हरवून पोर्तुगिज लोक राज्य करू लागले. पोर्तुगिजांच्या एका राजकन्येचे लग्न इंग्रज राजकुमाराशी जमले तेव्हा मुंबई इंग्रजांना हुंड्यात मिळाली.

इथल्या काही जागांची नावे परदेशातल्या भाषेत आहेत. पण ह्या जागांच्या नावांमागे मनोरंजक गोष्टी आहेत. त्या अश्या:

सांताक्रूझ ह्या शब्दाचा पोर्तुगिज भाषेत “पवित्र क्रॉस” असा अर्थ लागतो. ह्या ठिकाणी एक 150 वर्ष जुना क्रॉस आहे.

बँड्रा चे मराठी नाव वांद्रे आहे. ह्या नावामागे दोन कारणे असू शकतात. एक तर इथे अनेक वानरे होती म्हणून वांद्रे. किंवा इथे एक बंदर होते म्हणून बांद्रा. पोर्तुगिजांना हे नाव उच्चारता येईना म्हणून ते बँड्रा म्हणू लागले. ते लोक मुळात बंगाली लोकांसारखे “व” ला “ब” म्हणतात. वसई ला “बॅसीन” म्हणतात त्यावरून समजता येते.

मी माझ्या इंग्रजी उत्तरात विलेपार्ले चा शब्दशः अर्थ “पार्लेचे गाव” असा सांगितले आहे. पण ते इतके सोपे नाही आहे. हे नाव विलेश्र्वर आणि पार्लेशर ह्या दोन देवस्थानांवरून घेतले आहे. आणि ह्या जागेचे नाव पार्ले-जी ला देण्यात आले आहे.

कोलाबा म्हणाल तर मराठीच नाव आहे. रायगड जिल्ह्यात अलिबागच्या जवळ एक कुलाबा नावाचे गाव आहे. पूर्वी रायगड जिल्ह्याला कुलाबा जिल्हा म्हणायचे. मुंबईचे कोलबा एक वेगळे द्वीप होते ज्याला कोळी लोक “कोलाभात” म्हणायचे. नंतर नंतर ला ह्या जागेला “कंदील” म्हणायला लागले आणि शेवटी परदेशी लोकांनी त्याचे “कोलाबा” केले.

कफ परेड ची जागा समुद्राला हटवून घेतली आहे. बॉम्बे सिटी इम्प्रुवमेंट ट्रस्ट च्या “टी डब्ल्यू कफ” ह्या इंग्रज अधिकाऱ्याचे नाव ह्या जागेला दिले आहे.

वर्सोवा सुद्धा मराठीच नाव आहे. ह्या जागेचे मूळचे नाव “विसावा” असे सांगितले जाते. कालांतराने विसाव्याचे वर्सोवात रुपांतर झाले.

एलफिन्स्टन रोड – जॉन एलफिन्स्टन नावाचा एक इंग्रज अधिकारी मुंबईचा राज्यपाल होता.

चर्नी रोड – इथे गाई गुरे चारायची म्हणून “चर्णी” रोड.

कॉटन ग्रीन – इथे एक कापूस एक्सचेंज हिरवळीवर बांधले होते म्हणून “कॉटन” आणि “ग्रीन.”

करी रोड – रेल्वे अधिकारी सी करी च्या नावावरून.

सँढर्स्ट रोड – विल्यम मॅन्सफिल्ड (फर्स्ट विस्काउंट सँढर्स्ट) ह्या इसमाच्या नावावरून.

रे रोड – इंग्रज अधिकारी आणि मुंबईचा राज्यपाल डोनाल्ड जेम्स मॅके (द लॉर्ड रे) ह्या माणसाच्या नावावरून.

ग्रँट रोड – इंग्रज अधिकारी आणि मुंबईचा राज्यपाल रॉबर्ट ग्रँट च्या नावावर हे नाव ठेवले आहे.

अँटाॅप हील – ह्या डोंगराचा मालक एक अंतोबा नावाचा माणूस होता. इंग्रज लोक त्याला अँटाॅप उच्चारायचे म्हणून.

चर्चगेट – इथे सेंट थॉमस कॅथेड्रल आहे म्हणून “चर्च” आणि फोर्ट किल्ल्याचे तीन प्रवेशद्वार होते म्हणून “गेट.”

माहिती: चैतन्य कामत (संपादक – इक्सिया सोल्यूशन्स्)

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply