झोपताना डोक्याखाली उशी चांगली की वाईट?

अनेकदा मानदुखी उद्भवेल या भितीने आपण उशीचा वापर करत नाही. मात्र डोक्याखाली वापरण्यात येणारी उशी मानेच्या आणि पाठीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते का?

उशी घेऊन नको झोपू.मानेला त्रास होईल. रात्री झोपताना उशी घेतल्यावर अनेकदा आजी आणि आई आपल्याला उशी घेऊ नको त्यापेक्षा पायाखाली उशी घेऊन झोप असं सांगतात. तसंच उशीमुळे मान दुखेल असं मानत आपण उशीचा वापरही करत नाही. मात्र उशी घेणं खरचं तुमच्या मानेच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते का?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, झोपताना जाड उशी डोक्याखाली घेऊ नये. याशिवाय व्यक्तीला कोणती समस्या आहे यावर उशी घेऊन झोपावी की नाही हे ठरवता येता. ज्या व्यक्तींना रक्तदाबासंदर्भात त्रास असेल त्या व्यक्तींना शक्यतो पायाखाली उशी घेऊ झोपण्याचा सल्ला देण्यात येतो.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना पुण्यातील देवयानी रूग्णालयाचे आर्थोपेडिक डॉ. श्रीरंग लिमये म्हणाले, “डोक्याखाली किंवा पायाखाली उशी घ्यायची की नाही हे त्या व्यक्तींला काय त्रास आहे यावर अवलंबून आहे. जर रूग्णाला मानेचा त्रास असेल तर झोपायची गादी किंवा डोकं यामध्ये जागा राहाता कामा नये. यानुसार उशीचा वापर करावा. तर ज्या व्यक्तींना व्हेरीकोस व्हेन्स, पायाला सूज येणं किंवा पायाच्या इतर समस्या असतील तर त्यांनी पायाखाली उशी घेऊन झोपणं फायदेशीर ठरेल.”

बाणेरच्या सनशाईन फिजीयोथेरेपीच्या कंसल्टंट फिजीयोथेरेपीस्ट डॉ. मुग्धा कोल्हटकर यांच्या सांगण्यानुसार, “जर व्यक्तीला मानेचा त्रास आहे त्यांनी मान आणि खांद्याला आधार मिळेल असा उशीचा वापर करावा. तर काही व्यक्तींना कमरेचा त्रास असतो त्यांनी गुडघ्याच्या खाली उशी ठेवावी. जसा व्यक्तीला त्रास असेल त्यानुसार उशीचा वापर करावा.”

माय मेडिकल मंत्राशी बोलताना स्पर्श रूग्णालयाचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. राहुल बडे म्हणाले की, “सतत जाड उशीचा वापर केल्यास मानदुखीच्या किंवा पाठदुखीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. जाड उशी घेतल्याने मान वाकण्याची शक्यता असते. त्यामुळे मऊ आणि पातळ उशीचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं.”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.19