मृत्यूनंतर काय होतं? मृत्यूबाबतची 8 तथ्य

मृत्यू होणार हे सर्वांनाच माहिती असतं. मात्र, त्यानंतर आपलं काय होतं याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जातात. जगात सर्वात जास्त मृत्यू कशामुळे होतात? मृत्यूनंतर काय होतं? जगभरात कोणत्या कारणामुळे आणि कशा पद्धतीने होतात सर्वाधिक मृत्यू? मानवाचा जन्म झाला तेव्हापासून किती मृत्यू झाले? कोणकोणत्या प्रकारचा मृत्यूदंड कायदेशीर आहे अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न…

मरण्यापूर्वी जे अन्न पोटात गेलं असेत त्याच अन्नात तयार झालेली संप्रेरके (एंजाइम) मृत शरिराला खाऊन टाकतात. मृत पावलेल्यांना दफन करण्याची परंपरा ही 350 हजार वर्षांपेक्षाही पुरातन आहे अशी मान्यता आहे. तर मानवाचा जन्म झाला तेव्हापासून 100 बिलियन लोकं मृत पावले. त्यापैकी 153 हजार लोकांचा मृत्यू हा त्यांच्या जन्मदिनीच झाला असं म्हटलं जातं.

खराब हँडरायटिंग असलेलं मेडिकल स्क्रिप्ट न वाचता आल्यामुळे दरवर्षी जवळपास 7 हजार लोकांचा मृत्यू होतो असं ‘नॅशनल अकादमी ऑफ साइंस इंस्टिट्यूट’चं म्हणणं आहे. तर दरवर्षी जवळपास 440 हजार लोकांचा मृत्यू हा मेडिकल सायनच्या अशा चुकांमुळे होतो जे टाळता येऊ शकले असते.

माऊंट एवरेस्टवर चढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण काही कारणामुळे ज्यांचा मृत्यू झाला असे 200 मृत शरीर माऊंट एवरेस्टवर पडलेले आहेत. आता ते शव इतरांना शिखरावर पोहोचण्यासाठी रेफ्रंस पॉइंट ठरत आहेत. एक शार्क मासा वर्षभरात जवळपास 12 लोकांचे प्राण घेतो. तर माणूस एका तासात जवळपास 11,417 शार्क मासे मारतो.

सुदानमध्ये सुळावर चढवून मृत्यूदंड देणं कायदेशीर मानलं जातं. तर टाइम मैग्जीनच्या माहितीनूसार यूएस मध्ये दरवर्षी 600 लोकांना मृत्यू हा झोपेत बेड वरून खाली पडल्याने होतो.

विमान दुर्घटनेत मेलेल्यांपेक्षा विमानतळावर पोहोचताना रस्त्यावर झालेल्या दुर्घटनांमध्ये मरणाऱ्यांचं प्रमाण अधीक आहे. मेल्यानंतर ऐकण्याची क्षमता सर्वात शेवटी बंद होते.

ब्रिटेनमध्ये एक अशी संस्था आहे जी अंतिम संस्काराच्यावेळी रडण्यासाठी लोकं पुरवते. 2013 मध्ये गुगलने Calico नावाच्या कंपनीला मृत्यूवर संशोधन करण्यासाठी मोठा फंड दिला होता अशी माहिती आहे.

सद्याच्या घडीला जगात सर्वाधिक मृत्यू हे हृदयाशी निगडीत आजारांमुळे होतात. आणि व्यक्तीचा मृत्यू केव्हा झाला हे एक संशोधकच सांगू शकतो. ही सर्व तथ्य msn.com ने सुद्धा प्रसिद्ध केली होती.

वरील दिलेली माहिती पूर्णपणे बरोबरच असेल असं नाही. ते लेखकाने वयक्तिक अभ्यास करून मांडलेली माहिती आहे. याचा Bhannatre.com शी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

माहिती स्रोत: News18Lokmat

Leave a Reply