टिकटॉकवर विष्णुप्रिया रातोरात बनली स्टार

एका क्षणात नशीब कसे पालटू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे औरंगाबादेतील १९ वर्षीय तरुणी विष्णुप्रिया नायर. एका साधारण कुटुंबातील या तरुणीला एका रात्रीतून स्टारडम प्राप्त झाले. चार महिन्यांपूर्वी मित्र-मैत्रिणींकडून टिकटॉक या व्हिडिओ शेअरिंग ॲपची माहिती झाली. पावणेदोनशेवर व्हिडिओ बनवले. त्याला जेमतेम प्रतिसाद मिळाला, पण ९ दिवसांपूर्वी ‘खुदा की इनायत’ या गाण्याचा अवघ्या १५ सेकंदांचा व्हिडिओ टिकटॉकवर शेअर केला.

अन् पाहता पाहता सोशल मीडिया, यूट्यूबवर विष्णुप्रियाने धूम केली. ही तरुणी आहे तरी कुठली याची माहिती घेण्यासाठी यूट्यूबवर असंख्य सर्च होत आहे.

विष्णुप्रियाच्या फॉलोअर्समध्ये तर दिवसेंदिवस वाढ होत आहे. टिकटॉकवर तिच्यासोबत हजारो युजर्स ड्युएट बनवत आहेत. विष्णुप्रियानेटिकटॉकवर आवाहन करून चाहत्यांना हिमायतबागेत भेटण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर चार हजारांवर तरुण तिला भेटण्यासाठी आले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बाऊन्सरची मदत घ्यावी लागली.

व्हिडिओसाठी दिवसभर वेटिंग

विष्णुप्रियाचे वडील जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करतात, तर आई शिक्षिका आहे. जवाहर कॉलनीत तिचे घर असून तिच्यासोबत व्हिडिओ काढण्यासाठी दिवसभर तरुण-तरुणींची रिघ लागत आहे.

Vishnu Priya Instagram

चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळत असले तरी निवडक ओळखीच्या व्यक्तींसोबत तसेच जास्तच आग्रह करणाऱ्या ५ ते ६ लोकांसोबत व्हिडिओ बनवत असल्याचेतिने ‘दिव्य मराठी’ला सांगितले. विष्णुप्रिया व मित्रांनी मिळून एक ‘#ड्रीम टीम’ तयार केली आहे.

यात साई पाटील, श्याम, रुद्र, ऐश्वर्या यांचा समावेश आहे. व्हिडिओ बनवताना शहरातील साई टेकडी, सिद्धार्थ उद्यान, हिमायतबाग अशी निसर्गरम्य ठिकाणेशोधून तेथे शूट केले जाते. त्यानंतर एडिटिंग करून ते व्हिडिओ अपलोड करत असल्याचे ती म्हणाली. सिनेमाच्या शूटिंगप्रमाणे लाइट इफेक्ट, एक्स्प्रेशन, साइड सीन या सर्व गोष्टींचा विचार केला जात असल्याचेसाई पाटील म्हणाला.

नियोजनबद्ध तयारी

विष्णुप्रियापाठोपाठ शहरातीलच ऋषिकेश टिकटॉकवर प्रसिद्धीच्या झोतात आहे. तुळजाभवानी महाविद्यालयात तो बी.एस्सी. तृतीय वर्षात शिकतो. ऋषिकेश व त्याच्या मित्रांनी मिळून ‘टीम 5152’ बनवली आहे. यात मास कम्युनिकेशन शिकणारा राकेश रवळे, विक्रांत वाघमारे यांचा समावेश आहे.

पुणे,मुंबई, बीडहून तरुणांची गर्दी

विष्णुप्रिया, ऋषिकेश यांचानित्यक्रम एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे असतो. विष्णुप्रियाने तर कंटाळून तीन मोबाइल नंबर बदलले. ऋषिकेश मात्र त्याला वेळ असेल त्याप्रमाणे चाहत्यांना भेटतो. मुंबई, पुणे, परळी-वैजनाथ, लातूर, हिंगोलीहून चाहतेशहरात येत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply