‘लागीरं झालं जी’ फेम विकी पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात

‘लय असतील मनमौजी पण लाखात एक माझा फौजी’ असं म्हणायला लावणार्‍या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेतील फेम विकी प्रेमात पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. अचानक काही कारणाने झालेली भेट आणि त्या भेटींच हळूहळू प्रेमात होणार रुपांतर हे काही कुणासाठी नवीन नाही. सध्या अशाच एका गोड जोडीमध्ये गुपचूप गुपचूप काहीतरी सुरु असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ती जोडी म्हणजे अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री भाग्यश्री नवले. या दोघांमध्ये प्रेमाचे वारे वाहू लागल्याचे दिसून येत आहे.

फेम विकी…

‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेतील फेम विकी म्हणजेच निखिल चव्हाण अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. याच निखीलची लव्हस्टोरी सध्या चर्चेत आहे. निखिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये निखिलने अभिनेत्री भाग्यश्रीसोबतचा एक स्पेशल फोटो शेअर केला आहे. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्या फोटोला दिलेल्या कॅपशनने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. निखिलने फोटो शेअर करत त्या फोटोखाली Something…Something…Something असं लिहीत चांगले दोन – तीन हार्टही शेअर केलं आहे. त्यामुळे नेमकं या दोघांमध्ये काय सुरु आहे हे गुलदस्तात आहे.

 

View this post on Instagram

 

Something….something…. something..💞❤️ #somethingishappening #somethinginbetween #life

A post shared by Nikkhhil chavaan (@nikkhhil_29) on

अशी सुरु झाली लव्हस्टोरी

या दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली ती म्हणजे पुण्यातील महालक्ष्मी मंदिरातून आणि दोघेही एकमेकांची साथ एन्जॉय करण्यासाठी डेटला जाऊ लागले आहेत. नुकतंच या लव्ह बर्डसना विरारच्या फार्म हाऊसवर सोबत हाऊसवर सोबत बघण्यात आलं आहे. त्यामुळे या दोघांची गुलाबी थंडीतील लव्हस्टोरी चांगलीच रंगली आहे.

स्त्रीलिंग पुलिंग वेबसीरिज

अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री भाग्यश्री नवले ही रिअल लाईफ लव्हबर्डस ‘शुद्धदेसी मराठी’च्या ‘स्त्रीलिंग पुलिंग’ या नव्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे आधीच त्यांची फुलत असलेली लव्हस्टोरी चर्चेत आहे आणि त्यात त्यांनी नवीन वेबसीरिज येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता ताणलेली राहायला मिळत आहे. या वेबसीरिजचा धमाकेदार ट्रेलर देखील नुकताच लॉंच झालाय.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.