निवडून आल्यानंतर उदयनराजेंनी घेतला मोठा निर्णय

सातारा लोकसभा मतदार संघातून विजयी झाले असतानाही खासदार उदयनराजे भोसले यांनी जल्लोष करत अंगावर गुलाल घेण्यास विरोध केला आहे.

राज्यात भाजपा २३, शिवसेना १८, कॉंग्रेस १, राष्ट्रावादी ५ तर वंचित १ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यानाचा दणदणीत विजय झाला आहे. उदयन महाराज विजयी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरन निर्माण झाले आहे. तर बऱ्याच ठिकाणी विजयाचा गुलालाही उडला आहे.

परंतु उदयनराजे भोसले यांनी जल्लोष करत अंगावर घेण्यास विरोध केला आहे. राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. मला माझ्या विजयापेक्षा माझे शेतकरी महत्वाचे आहेत. मला माझ्या शेतकऱ्यांची जाणं आहे त्यामुळे मी यंदा विजयाचा गुलाल अंगावर घेणार नाही. असे उदयन राजे यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, दोन दिवसांआधी एक्झिट पोलवर दर्शविण्यात येणाऱ्या आकड्यांवर विचारले असता, एक्झिट पॉल गेले खड्यात, माझ्या शेतकर्यांना पाणी, चारा कसा मिळेल याकडे पहिले लक्ष द्या असे त्यांनी म्हंटले होते.

स्त्रोत : महाराष्ट्र देशा

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply