यावरूनच कळले की, उदयनराजेंना रयतेचा राजा का म्हणतात

सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्री. छ. उदयनराजे कधी काय करतील, याचा नेम नाही. सध्या सातारा लोकसभेच्या अनुषंगाने जिल्हाभरात वादळ उठलेले आहे. उदयनराजे कोणत्या पक्षातून उभे राहणार, उदयनराजे निवडून येणार की नाही, अशा चर्चा झडत असतानाच खा. उदयनराजेंनी मात्र लष्करात जवान असलेल्या प्रदीप क्षिरसागर या युवकाला मात्र सुखद धक्का दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मूळचे सातारचे असणारे प्रदीप क्षिरसागर हे अनेक दिवसांपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. प्रदीप क्षिरसागर हे प्रथमपासूनच खा. उदयनराजेंचे फार मोठे फॅन आहेत. काल प्रदीप क्षिरसागर यांना खा. उदयनराजे भोसले दिल्लीत असल्याचे समजले. त्यावेळी क्षिरसागर यांनी दिल्लीमध्ये खा. उदयनराजेंची भेट घेतली.

यावेळी उदयनराजेंनी क्षिरसागर यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यावेळी क्षिरसागर यांनी मी दिल्लीवरुन पुण्याला चाललो आहे, असे सांगितले. यावेळी उदयनराजेंनी कशाने चाललात, असे विचारले असता क्षिरसागर यांनी रेल्वेने चालल्याचे सांगितले. यावेळी उदयनराजेंनी त्यांच्या स्वीय सहाय्यकांना मी पुण्याला निघालोय, माझ्याबरोबर प्रदीप क्षिरसागर यांचेही विमानाचे तिकिट बुक करा, असे आदेश दिले.

त्यामुळे उदयनराजेंच्या या सुखद धक्क्यामुळे सैन्य दलातील तो जवान मात्र भारावून गेला. काहीक्षण आपण स्वप्नात आहे की काय, असे त्या जवानाला वाटले. तत्काळ तो जवान आपले सामान घेवून उदयनराजेंबरोबर एअरपोर्टवर गेला. उदयनराजेंच्या बाजुलाच बसून विमानातून पुण्यापर्यंत आला.

उदयनराजेंच्या या ‘जोर का धक्का धीरे से’ स्टाईलमुळे सैन्यदलातील प्रदीप क्षिरसागर या जवानाला मात्र आकाश ठेंगणे झाले. उदयनराजेंना उगाचच रयतेचे राजे म्हणत नाहीत, अशा भावना त्या जवानाने आपल्या फेसबुक पोस्टवर टाकून उदयनराजेंचे फ्लाईटमधील फोटोही शेअर करायला तो जवान विसरला नाही.

जिल्ह्यातील अनेक पुढारी आपल्या महागड्या गाड्यांमधून जिल्ह्यात व राज्यात दौरे करीत असतात. परंतू कट्टर कार्यकर्त्यालाही आपल्या गाडीत बसवताना ते दहावेळा विचार करतात. मात्र उदयनराजेंनी सातारा जिल्ह्यातील सैन्यातील जवानाला आपल्यासोबत ‘एअर लिफ्ट’ दिल्यामुळे खासदार उदयनराजेंच्या दर्यादिलीची चर्चा सातारा जिल्ह्यात आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Credit: SataraToday

Leave a Reply