‘तुला पाहते रे’मध्ये ‘या’ अभिनेत्याच्या मुलाची एन्ट्री

तुला पाहते रे मालिका आता एकदम रंजक वळणावर आलीय. आजपासून ( 30 एप्रिल ) मालिकेत राजनंदिनीची एंट्री होतेय. विक्रांतची राजनंदिनी पहिली बायको. ते कसे भेटले, कसं प्रेम जुळलं या सगळ्या गोष्टी आता समोर येणार आहेत. त्याचबरोबर राजनंदिनीचं आयुष्यही उलगडत जाणार आहे.

शिल्पा तुळसकर राजनंदिनीची भूमिका साकारतेय. तर तिचा लहान भाऊ म्हणजे छोटा जयदीप कोण साकारणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. छोटा जयदीप साकारतोय मल्हार भावे. म्हणजेच अभिनेता सुबोध भावेचा मुलगा. मालिकेत त्याची पहिलीच एंट्री आहे.

मध्यंतरी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत डाॅ. अमोल कोल्हे यांच्या मुलीनंही छोटी भूमिका साकारली होती.

बरेच दिवस ईशा आणि विक्रांतच्या गोड प्रेमाचा ओव्हरडोस झाला होता. आता विक्रांतचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला. इतकंच काय तर विक्रांतचं खरं नाव गजा पाटील असल्याचंही उघड झालंय.

सरंजामेंच्या कंपनीत फ्राॅड झाला. तो करणाऱ्या व्यक्तीचं नाव ईशानं शोधून काढलं. ते म्हणजे गजा पाटील. विक्रांत आणि झेंडेंना तो एक धक्काच होता. हे नाव आईसाहेबांना कळलं की सगळंच उघड होणार. त्यामुळे विक्रांत घाबरलाय.

राजनंदिनी आईसाहेबांची सावत्र मुलगी. जयदीपची बहीण. घरी सगळ्यांनाच तिचा लळा. अख्खं घर तिच्यावर जीव ओवाळून टाकत असतानाच अचानक तिचं निधन झालं. आता भूतकाळातल्या एकेक गोष्टी समोर येणार आहेत.

इतका मोठा विश्वासघात केल्यामुळे ईशा पुरती मनाने तुटते. खचून जाते. अशीच एकदा भेदलेल्या अवस्थेत ईशा रस्त्यातून जात असताना ट्रक उडवणार तोच जोगतीण तिचा हात खेचते आणि तिला वाचवते. तसंच ईशाचा जन्म हा एका उद्देशाने झाल्याचे ती आठवण करून देते. समोर ठेवलेल्या परातीतल्या पाण्यात ती ईशाला बघायला सांगते. ईशा परातीत बघते आणि तिला राजनंदिनीचा चेहरा दिसतो.

ईशा हीच राजनंदिनी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न विक्रांत सरंजामे करत असताना, ती खरीच गेल्या जन्मी राजनंदिनी होती, असं मालिकेत दाखवलंय. त्यामुळे आता या मालिकेत ईशाच डाॅमिनेटिंग होणार.

लेखकाने वयक्तिक अभ्यास करून मांडलेली माहिती आहे. याचा Bhannatre.com शी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply