या व्यक्तीची रंगावरून उडवली जात होती खिल्ली, सत्य समजताच सर्वांची बोलती झाली बंद

आपल्या देशात अजूनही वर्णद्वेष सर्रास चालतो. काळ्या रंगाच्या लोकांचा तिरस्कार केला जातो किंवा त्या व्यक्तीची चेष्टा करायलाही कोणी मागे पुढे पाहत नाही. निव्वळ शरीराचा रंग काळा असल्याने बऱ्याचदा त्या व्यक्तीच्या उत्तम गुणांकडे किंवा कौशल्याकडे दुर्लक्ष केले जाते. याचे वास्तव उदाहरण द्यायचे झाल्यास नुकतेच अश्याच एका व्यक्तीवर ट्रोल झाले, या व्यक्तीची सोशिअल मीडियावर इतकी खिल्ली उडवली गेली. 

कारण एकच कि या व्यक्तीचा रंग काळा आहे आणि त्याची पत्नी अतिशय देखणी आणि गोरी आहे.

या दोघांचे फोटो प्रचंड वायरल झाले पण जेंव्हा या व्यक्तीची हकीकत सर्वांना समजली तेव्हा सर्व नेटिझन्सची बोलती बंद झाली. कारण ती व्यक्ती कोणी सामान्य व्यक्ती नसून दक्षिण भारतीय सिनेमांमधली एक नामवंत व्यक्ती आहे.या व्यक्तीचे नाव आहे एटली कुमार हे एक प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर आहेत ज्यांच्या अनेक सिनेमा गाजल्या आहेत. २०१३ मध्ये रिलीज झालेली फिल्म राजा-राणी पासून त्यांनी आपल्या करिअरची सुरवात केली.

ही त्यांची पहिलीच फिल्म बॉक्स ऑफिसवर एवढी गाजली कि त्यांना यासाठी एटली कुमारना फिल्म फेअर मध्ये बेस्ट डायरेक्टर चा अवॉर्ड मिळाला. या फोटोज मध्ये जी महिला दिसतेय ती एटली कुमारची पत्नी कृष्णा प्रिया असून ती सुद्धा एक अभिनेत्री आहे. आठ वर्षे लिव्ह-इन मध्ये राहिल्यानंतर २०१४ मध्ये या दोघांनी लग्न केले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply