भन्नाट कल्पना! जुन्या बसेस पासून बनवले महिलांसाठी शौचालय

प्रत्येक भारतीय स्वच्छ भारतचे स्वप्न पाहतो, परंतु त्याचा भंग पण आपणच करतो. वाटेल तिथे कचरा टाकतो आणि पुरुष तर कुठे पण उभे राहून मूत्र विसर्जन करतात. स्वच्छतेच्या स्वप्नात टॉयलेट हे एक भिंतीप्रमाने अडथळा म्हणून उभे राहते. यामुळेच देशामध्ये दुर्गंधी पसरली आहे. पण या सर्वाचे निराकरण पुण्यातील दोन उद्योजकांनी केले आहे.

पुण्यातील उद्योजक उल्का सादळकर आणि राजीव खेर यांनी ‘ती’ नामक शौचालय सुरू केले आहेत. त्यासाठी ते पुणे महानगरपालिकेच्या जुन्या बसांचा वापर करीत आहेत. या बसेसच टॉयलेट मध्ये रूपांतर केले आहे. हे टॉयलेट्स पण असे बनवलेत कि तुम्ही पाहतच राहाल.

Bus toilet pune

या बसेसमध्ये दोन्ही प्रकारचे टॉयलेट्स आहेत पाश्चात्य आणि भारतीय. वॉशबेसिन आणि लहान मुलांसाठी डायपर बदलण्यासाठी जागा पण आहे. स्वछतेविषयी जागरूक करण्यासाठी TV ची व्यवस्था पण आहे. केवळ एवढेच नव्हे तर स्वस्त किंमतींमध्ये सॅनेटरी नॅपकिन देखील तेथे उपलब्ध आहेत.

Bus toilet pune

पुणे शहराची लोकसंख्या खूप जास्त आहे आणि टॉयलेट्सची कमतरता देखील आहे. जे सध्यस्थितीत टॉयलेट्स आहेत, ते इतके घाण आहेत कि ते वापरायोग्य नाहीत. ही समस्या लक्षात घेऊन पुणे शहरातील उदयोजक उल्का सादळकर आणि राजीव खेर यांनी हे टॉयलेट्स निर्माण केले आहेत.

Bus toilet pune

या कंपनीचे नाव Saraplast आहे, जे २०१६ पासून हे काम करत आहे. सध्या यांच्याकडे ११ बस टॉयलेट्स आहेत आणि दररोज हजारो महिला या टॉयलेट्सचा वापर करत आहेत. त्यांच्या यशस्वीतेचा अंदाज आपण घेऊ शकता की त्यांना आजपर्यंत या टॉयलेट्सची कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही.

The Better India शी बोलताना उल्का साळळकर म्हणाल्या, “आम्ही कुठेतरी वाचले होते की जुन्या बस बेघर लोकांसाठी घरे बांधण्यासाठी लोक वापरत आहेत. या संकल्पनेचा आम्ही स्त्रियांसाठी शौचालय बनविण्यासाठी केला. कारण भारतात स्त्रियांसाठी शौचालयाची समस्या खूप मोठी आहे.

Bus toilet pune

मराठीमध्ये ‘ती’ महिलांसाठी वापरली जाते. त्यांची कंपनी इव्हेंटसाठी मोबाइल शौचालय देखील प्रदान करते. महिला 5 रुपये देऊन त्यांना वापरू शकतात. तथापि, त्याला ते विनामूल्य उपलब्ध करावयाचे होते, परंतु आर्थिक कारणांसाठी तसे करू शकले नाही. ही बस सौर उर्जेवर चालवते. प्रत्येक बसमध्ये एक महिला कर्मचारी नेमण्यात आली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते

 

Leave a Reply