‘स्टायलिश बिअर्ड’साठी टीप्स

शेव्हिंग करून स्वच्छ, तुळतुळीत चेहरा ठेवण्याची फॅशन आता मागे पडू लागली आहे. दाढीचे केस नैसर्गिकरित्या आणि सोप्या पद्धतीनं कसे वाढवायचे यासाठी काही टीप्स.

शेव्हिंग करून स्वच्छ, तुळतुळीत चेहरा ठेवण्याची फॅशन आता मागे पडू लागली आहे. क्लीन शेव्हपेक्षा सध्या ट्रेंड आहे तो स्टायलिश बीअर्डचा. सेलिब्रिटी, खेळाडू यांनी तर यात भर घातली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याची भुरळ पडली आहे. त्यामुळे पार्टी असो, कार्यक्रम असो किंवा कोणता सण-समारंभ असो, स्टायलिस्ट दाढी-मिशा ठेवणं हा पुरुषांच्या तयारीचा एक भाग झाला आहे. मुलींनाही सध्या असेच चेहरे आकर्षित करतात. मात्र यासाठी तशी दाढी येणंही महत्त्वाचं असतं. दाढीचे केस नैसर्गिकरित्या आणि सोप्या पद्धतीनं कसे वाढवायचे यासाठी काही टीप्स

नियमित चेहरा धुवा

चेहऱ्यावरील तेलकटपणा, धूळ जमल्यास त्यामुळे चेहऱ्यावरील केसांची वाढ रोखली जाते. त्यामुळे चांगली दाढी हवी असेल, तर नियमितपणे चेहरा धुण्याची सवय ठेवा. चेहरा स्वच्छ करून फेशिअल स्क्रब वापरा, ज्यामुळे चेहऱ्यावरील छिद्रे मोकळी होतील. तसंच केस वाढताना येणारी खास रोखण्यासाठी मॉईश्चराईझर लावा.

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स घ्या

अयोग्य आहारामुळे केसांची वाढ खुंटू शकते. केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईयुक्त पदार्थांचा यांचा आहारात समावेश करा. फ्री- रेडिकल्सला कारणीभूत ठरणारे बर्गर, फ्रेंच फ्राईझ असे पदार्थ खाणं टाळा.

पुरेशी झोप घ्या

आपण जागे असण्यापेक्षा झोपल्यानंतर केसांची वाढ झपाट्यानं होते. दिवसाला किमान ८ ते १० तासांची झोप गरजेची असते. पुरेशी झोप न मिळाल्यास शरीराच्या कार्याची गती मंदावते. झोपण्यापूर्वी ताण येईल अशी अशी कार्य करणं किंवा कॅफिनेचं सेवन टाळा. शांत आणि आनंददायी झोप मिळाल्या शरीराची कार्य योग्यरित्या होतात.

ताण टाळा

ताण हा शरीरासाठी चांगला नाही. यामुळे अनेक आजार बळावतात. सर्वसामान्य शारीरिक कार्यांवरही परिणाम होतो. त्यामुळे जेव्हा ताण येईल, तेव्हा तुम्हाला रिलॅक्स वाटेल असं काहीतरी करा. ध्यानधारणा, योगा, शांत बसणे या गोष्टी तुम्ही करू शकता. कारण ताणामुळे केस वाढीला अडथळे येऊ शकतात आणि त्वचाही कोरडी होते.

तेल लावा

केसांच्या वाढीसाठी अनेक तेल बाजारात उपलब्ध आहेत. केसांच्या मुळांवर चांगला परिणाम करणारे असे तेल वापरा. नियमितपणे हे तेल चेहऱ्यावर लावा त्यामुळे दाढीचे केस वाढण्यास मदत होईल.

सोर्स – हेल्थ डायझेट

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.