या मजूरानी एका मुलीची इज्जत वाचवली होती आणि सात वर्षानंतर त्या मुलीने अशा प्रकारे त्याचे उपकार फेडले ! नक्की वाचा

शिवादास राणा सकाळी 6 वाजता मजुरीसाठी जात असे आणि संध्याकाळी घरी परत येईचा. कधीकधी शिवदासला खूप उशील होत असे. शिवदास कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील विभूतीपुरा या गावाचा निवासी आहे. शिवदास यांचे कुटुंबामध्ये त्यांच्या पत्नी आणि दोन लहान मुलं आहे. शिवदास त्याच दिवशी कोलारातून काम करून त्याच्या गावी परत येत होता. ते त्यांच्या तीन साथीदारांबरोबर दररोज येत जात असत, परंतु त्या दिवशी त्यांच्याकडे भरपूर काम होते. म्हणून त्याला रात्री 9 वाजले होते. त्याने आपली साईकल घेतली आणि गावाकडे निघाला. कोलारपासून 5 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला शेतातून काही आवाज येत होती. आवाज ऐकून शिवदास थांबला.

जेव्हा तो थांबला तेव्हा त्याने एका मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकला. मग शिवदास स्वतःबद्दल काही विचार न करता तो शेताकडे पळत गेला होता. जवळ गेल्यानंतर शिवदासाने पाहिले तेव्हा तो थक्क झाला. त्याने पाहिले कि तीन मुलं निर्दोष मुलीला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करीत होती.

अचानक शिवदास तिथे पोहोचला तेव्हा, मुलांनी मुलीला सोडून शिवदासवर हल्ला केला. शिवदासही त्यांच्याशी लढत राहिला. मुलांनी शिवदासवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केला, परंतु शिवदासनी धैर्य गमावले नाही आणि त्यामुळे मुलांना तेथून पळ काढण्यास भाग पाडले. शिवदास गंभीर जखमी झाला परंतु त्याचे धैर्य तुटले नाही.

त्याने त्या मुलीला साईकलवर बसवले आणि कोलारातील केईबी कॉलनीमध्ये तिच्या घर सोडले, पण आता तो गंभीर जखमी असल्यामुळे अशक्त झाला होता. म्हणूनच तो त्या मुलीच्या घराजवळ खाली पडला. जेव्हा मुलीच्या परिवारातील सदस्यांनी हे सर्व पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले.

त्यांनी शिवदासला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्या मुलीचे नाव रश्मी गुप्ता आहे. तिचे वडील सैन्यात एक अधिकारी होते. त्या दिवशी ती तिच्या मित्राबरोबर फिरायला गेली होती आणि त्याच वेळी त्या तीन मुलांनी तिला जबरदस्तीने एका गाडीत उजळून शेतात घेऊन गेले. हे सगळं बघून तिचा मित्र पळून गेला आणि शिवदासने तिची मदत केली. त्या वेळी रश्मी हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास करत होती.


शिवदास यांना तीन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आणि रश्मीने देखील त्याची चंगली काळजी घेतली. शिवदास बरा झाला आणि आपल्या घरी आला. या घटनेच्या सात वर्षानंतर शिवदास दररोज सारखा मजुरीसाठी शहरात गेला होता आणि रश्मी आणि त्यांचे वडील अविनाश गुप्ता त्याच्या घरी पोहोचले. शिवदासच्या पत्नीने सांगितले कि तो संध्याकाळी पर्यंत घरी येईल. रश्मी आणि तिचे वडील संध्याकाळपर्यंत त्याची वाट पाहत होते.

जेव्हा शिवदास संध्याकाळी घरी आला, तेव्हा त्याच्या घराजवळ पोलिसांना पाहून घाबरून गेला होता. मनातल्या मनात काहीही शंका येत होत्या, पण जेव्हा तो घरी गेला तेव्हा त्याने एक सेना अधिकारी आणि त्याच्या घरात बसलेल्या एका सुंदर मुलीला पाहिले. रश्मीच्या वडिलांसोबत आणखी तीन लष्करी मित्र आले होते.

तेव्हा शिवदास काही समजू शकला नाही. अशा परिस्थितीत रश्मी उठून शिवदासाच्या पायांना स्पर्श करुन सात वर्षांच्या जुन्या घटनेची आठवण करून दिली. शिवदास त्या घटनेला एक स्वप्ना सारखा विसरून गेला होता, परंतु त्या घटनेला रश्मी कसे विसरू शकते ज्यामध्ये तिला एक नवीन जीवन मिळाले.

रश्मीच्या वडिलांनी त्याला कोलार मध्ये एक घर आणि एक ऑटो रिक्षा विकत घेऊण दिले. शिवदास आज मजुरी करत नाही, ऑटो रिक्षा चालवतो. आता रश्मीने बंगलोरमध्ये एक हॉटेल उघडले आहे आणि नेहमी शिवदासला भेटण्यास येते आणि शिवदासच्या मुलांचे शिक्षणावरील सर्व खर्च ती भरत आहे. इतरांना मदत करण्यास नेहमीच तयार राहायला हवे कारण कोणास मदत करणे ही जगातील सर्वात मोठे पुण्य मानले जाते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

One Comment

Leave a Reply

Leave a Reply