हे घरगुती उपाय मिनिटांमध्ये संपवेल तुमची डोके दुखी

धावपळीच्या जीवनात, ऊन आणि उष्णता हे अगदी सामान्य समस्या आहे. त्यामुळे लोकांना डोके दुखीची समस्या होते. प्रत्येक वेळेस डोके दुखीसाठी औषधे घेणे देखील नुकसानरकारक ठरू शकते. आयुर्वेदिक चिकित्सक अखिलेश कुमार विजय म्हणतात कि आयुर्वेदिक पद्धतीने घरगुती उपाय करून तुम्ही डोके दुखी वर नियंत्रण ठेवू शकता.

 

डोके दुखी पासून पटकन सुटका मिळवण्यासाठी लवंग च्या पावडर मध्ये मीठ मिसळून मिश्रण बनवा आणि ते दूधाबरोबर प्या. काही मिनिटांमध्येच डोके दुखी हि थांबेल. लवंगचा किस करून त्याचा लेप देखील डोक्याला लावू शकता.

 

शरीरातील आम्लांचं प्रमाण कमी अधीक झाल्यास डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी असल्यास लिंबूपाण्यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालून ते प्यावं. लिंबू पाण्यामुळे शरीरातील आम्लांच (अॅसीडचं) प्रमाण संतुलित होतं.

 

डोकेदुखी घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लवंग. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.

ऑक्सिजनची कमतरता हेही डोकेदुखीचे एक कारण असू शकते. त्यामुळे डोके दुखत असल्यास जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल अशा भरपूर झाडं असलेल्या भागात एखादा फेरफटका मारावा. हा फेरफटका मारताना मोठ्याने श्वास घ्यावा आणि सोडावा. डोकेदुखी नक्कीच कमी होते.

जर डोके दुखीची समस्या हि नेहमचीच होत असेल तर रोज सकाळी सफरचंद वर मीठ लावून ते उपाशी पोटी खावे. यानंतर कोमट दूध प्यावे. काही दिवसांसाठी याचे पालन केल्यास डोके दुखी हे कायमची नष्ट होऊ शकते. त्वरित डोके दुखी पासून आराम मिळवण्यासाठी एक स्वछ कपड्यात बर्फाचा तुकडा बांधा आणि १० मिनिट डोक्यावर ठेवणे आणि काढणे यामुळे आराम मिळेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply