‘ही’ आहे पुण्यातील शॉपिंगसाठीची प्रसिद्ध ठिकाणे

पुणे हे तसे एक नावाजलेलं शहर. याला शिक्षणाची पांढरी असेही म्हणतात. परंतु हे अनोखे शहर अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे आणि ते आहे येथील फॅशन स्ट्रीट. पुण्यात असल्या खरेदीसाठी अनेक बाजार असले तरी त्यातील काही खूपच प्रसिद्ध आहेत. येथे तुम्ही कमी किमतीत हवे ते शॉपिंग बिनधास्त करू शकता. बार्गेन म्हणजे घासाघीस करण्यात तुम्ही कुशल असाल तर हि खरेदी आणखी मजेदार बनू शकते.

फॅशन स्ट्रीट

पुण्याच्या कॅम्प भागात रस्त्यावर लागणारा हा बाजार. सर्व प्रकारचे फॅशनेबल कपडे, पर्सेस, विविध फॅशनचे जोडे, ज्युवेलरीसाठी हा बाजार प्रसिद्ध असून येथे आपल्याला हव्या त्या किमतीत वस्तू मिळू शकतात. येथेही खरेदी करताना बार्गेनिंग जरूर करावे.

जुना बाजार

जुना बाजार हे पुण्याचे खास आकर्षण आहे. दर बुधवारी आणि रविवारी हा बाजार भरतो. शनिवार वाड्यापासून जवळ हा बाजार लागतो आणि येथे फर्निचर, प्रवासी बॅग, लोखंडी समान, शेती अवजारे, घरगुती वापराच्या वस्तू, घड्याळे, कपडे याचबरोबर जुनी नाणी, जुन्या मूर्ती, जुने सामान विकले जाते. याला चोर बाजार असेही म्हणतात मात्र हा त्या अर्थाने चोर बाजार नाही. एकदा तरी या बाजारात आवर्जून चक्कर मारलीच पाहिजे असा हा मस्त बाजार आहे.

हाँगकाँग लेन

पुण्याच्या डेक्कन भागातली हि गल्ली खरेदीसाठी प्रसिद्ध असून येथेही अनेक प्रकारच्या वस्तू मिळतात. कपडे, पर्सेस, बॅग्ज बरोबर घड्याळे, मोबाईल, अक्सेसरीज विकणारी दुकाने येथे आहेत. येथे इम्पोर्टेड मालासाठी प्रामुख्याने गर्दी होते. इम्पोर्टेड सेंट्स, घड्याळे, शूज अश्या अनेक वस्तू येथे मिळतात. येथेही बार्गेनिंग करता येते.

फर्ग्युसन रोड

अनेक प्रसिद्ध दक्षिणात्य हॉटेलप्रमाणेच हा रस्ता शॉपिंग साठीही ओळखला जातो. येथे प्रामुख्याने तरुणाईला आवडतील अश्या वस्तू मिळतात. कॉलेज गोइंगची प्रामुख्याने येथे गर्दी असते आणि लेटेस्ट फॅशनचे कपडे, चपला, पर्सेस, गॉगल्स अशा अनेकविध वस्तू येथे स्वस्तात खरेदी करता येतात. या शिवाय येथे जुन्या पुस्तकांचे स्टॉल आहेत तसेच खादडी साठी अनेक टपऱ्या आणि मोठी रेस्टोरंट आहेतच.

लक्ष्मी रोड

पुण्यातील हे प्रख्यात स्ट्रीट मार्केट आहे आपल्याला येथील दुकानात दागदागिने आणि रंगीत बांगड्या आणि कपडे अगदी माफक दरात मिळतील. आपण पुण्यातील स्थानिक खरेदी बाजारपेठांचा शोध घेत असाल तर, तर आत्ताच लक्ष्मी रोडसाठी या मार्केटमध्ये पोहोचा आणि आपण कधीही न ऐकलेल्या काही ऑफर तुम्हाला येथे मिळतील. कपड्यांपासून ऍक्सेसरीज येथे सर्व गोष्ठी आपल्याला मिळतील. 

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply