जमिनीवर कधीच पडत नाही ‘या’ रहस्यमयी मंदिराच्या कळसाची सावली !

जमिनीवर कधीच पडत नाही ‘या’ रहस्यमयी मंदिराच्या कळसाची सावली !
भारत देशात मंदिराची काही कमी नाही.त्यातली त्यात जवळ जवळ सर्वच मंदिरे रहस्यमयी आहेत.असेच एक तमीळनाडूतील तंजावर येथे असलेले बृहदेश्वर शिवमंदिर आजही संशोधकांसाठी रहस्यमयी मंदिर आहे.मंदिराचे वैशिट्ये म्हणजे या मंदिराच्या भव्य शिखराची सावली जमिनीवर पडत नाही.

विशेष म्हणजे दुपारी मंदिराच्या सर्व भागांची सावली जमिनीवर पडते मात्र कळसाची सावली पडत नाही.या मंदिराची वास्तूकला, पाषाण व ताम्र शिल्पे कलेचा बेजोड नमुना समजली जातात. सुरवातीला या मंदिराचे नामकरण राजराजेश्वर मंदिर असे केले गेले होते मात्र मराठा शासकांनी तंजावरवर केलेल्या आक्रमणानंतर त्याला बृहदेश्वर असे नांव दिले गेले.

या मंदिरासाठी १ लाख ३० हजार टन ग्रॅनाईटचा वापर केला गेला असून हा दगड या परिसरात कुठेही मिळत नाही. त्यामुळे ग्रॅनाईटच्या इतक्या प्रचंड शिळा येथे १ हजार वर्षांपूर्वी कशा आणल्या गेल्या असतील याचेही गूढ आहे. तसेच मंदिर बांधताना ते लॉकींग पद्धतीने बांधले गेले असून कुठेही सिमेंट, चुना, रेतीचा वापर केला गेलेला नाही.

मंदिरावर सुवर्णकळस असून तोही एकाच अखंड दगडातून बनविला गेला आहे. या कळसाचे वजन आहे ८० टन. इतका मोठा कळस या १३ मजली २१८ फूट उंचीच्या मंदिरावर कसा चढविला गेला याचेही कुतुहल कायम आहे. मंदिरासमोर असलेला नंदी हा जगात दोन नंबरचा मोठा नंदी आहे. १६ फूट लांब व १३ फूट उंचीचा हा नंदी अखंड दगडातून कोरला गेला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply