पोट साफ होण्यासाठी करा हे उपाय

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपचार :

रात्री झोपताना अर्धा चमचा ओवा चावून खाल्ल्यास शौचास साफ होतो.

मालावरोधाच्या तीव्रतेनुसार अर्धा ते एक चमचा एरंडेल रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याबरोबर प्यावे.

पोट साफ होण्यासाठी उपाय :

रात्री झोपताना कप भर पाण्यात एक ते दोन चमचे साजूक तूप व किंचित सैंधव टाकून प्यावे. याने मालावरोधाच्या त्रास कमी होईल.

रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात भिजवलेल्या मनुका खाल्ल्यास मालावरोधाचा त्रास कमी होऊन पोट साफ होते.

ताज्या कोरफड चे पण मंद विस्तवावर किंचित शेकावे. नंतर त्याचे साल काढून त्यातील गर फडक्यात धरून घट्ट पिडावा. आणि चमचाभर रस मधात घालून प्यावा. असे काही दिवस केल्यास, पोट नेहमी साफ होते आणि मलावरोध होत नाही.

रोज सकाळी दोन खजूर साजूक तुपाबरोबर खाल्ल्यास शौचाला कडक होण्याची सवय मोडते.

शक्यतो गरम पाणी प्यावे. शिळे व कोरडे अन्न टाळावे. नियमित हलके जेवण करावे. जेवण वेळेवर करावे.

मालावरोधाच्या प्रवृत्ती असलेल्यांनी आमटी, भाजी वैगैरे करताना तूप वापरावे व फोडणीत लहसून वापरावा.

दुधी, घोसाळी, दोडक्याच्या नियमित वापर केल्यास मलाचा खडा होत नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply