स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका लहानापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वाना प्रचंड आवडते. पण कित्येक दिवसांपासून हि मालिका टिआरपीच्या रेसमध्ये नेहमी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर आहे. हि मालिका प्रचंड लोकप्रिय असून देखील या मालिकेचा टिआरपी इतका कमी का असा प्रश्न या मालिकेच्या प्रेक्षकांना सतत पडत होता. परंतु या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचा टिआरपीच्या २ क्रमांकावर आहे.

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरू आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार या आठवड्यात झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे तर माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने आता महत्वाचा पल्ला गाठलेला आहे तर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. त्यामुळे गेल्या कित्येक पहिल्या स्थानावर आहे.

चला हवा येऊ द्या आता तिसऱ्या स्थानावर तर तुझ्यात जीव रंगला हि चौथ्या स्थानावर आहे. तसेच कधी काली पहिल्या स्थानावर राहिलेल्या तुला पाहाते रे हि मालिका आता पाचव्या स्थानावर आहे. यावरून या दोन्ही मालिकांची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसून येत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

Leave a Reply