‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेसाठी विकले स्वतःचे घर! वाचा डॉ. अमोल कोल्हे खडतर जीवनप्रवास

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील संभाजी महाराजांचे पात्र करणारे डॉ. अमोल कोल्हे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. आज आपण त्यांच्या खडतर जीवनप्रवास थोडा फार जाणून घेऊ.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य महाराष्ट्रातील प्रत्येकाला लक्ष्यात राहावे यासाठी अमोल कोल्हे यांची जणू छत्रपती शिवराय अवतरले असे वाटते. त्यांनी “राजा शिवछत्रपती” हि मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली हे तर आपल्याला माहीतच असेल परंतु त्यामागची त्यांची मेहनत मात्र आपल्याला नक्कीच माहित नसेल. तुम्हाला हे हि नक्कीच माहित नसेल कि त्यांनी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेसाठी चक्क स्वतःच घर विकलं, चला तर आपण पाहूया या ध्येय वेड्या कलाकारचा खडतर प्रवास.

डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९८० पुणे जिल्ह्यातील नारायणगाव या ठिकाणी झाला. अमोल कोल्हे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले आणि त्यांनी मुंबईतील जीएस महाविद्यालयातून एमबीबीएस हि पदवी घेतली. काही दिवस त्यांनी केईएम रुग्णालयात  प्रॅक्टिस देखील केली. जीएस महाविद्यालयात नेहमी होणाऱ्या नाट्य आणि अभिनयाच्या कार्यक्रमामुळे ते या क्षेत्रांकडे ओढेल गेले. महाविद्यालयांत नेहमी होण्याऱ्या या कार्यक्रमांमध्ये ते सहभाग घेऊ लागले. त्यावेळी त्यांनी “शांतेच कार्ट चालू आहे” या नाटकात देखील त्यांनी काम केले. परीक्षेच्या काळात होणाऱ्या नाटकांच्या स्पर्धाना मात्र त्यांना मुकावे लागायचे.

त्यांनी नंतर कॉलेजातील मित्रमंडळींना घेऊन नवा उपक्रम सुरु केला आणि डान्स मध्ये मित्रांना सहभागी केलं तेव्हा त्यांची भेट झाली ती सुबल सरकार यांच्याशी ज्यांना अमोल गॉड फादर मानतात. अमोल कोल्हे यांचे अभिनय पाहून रवी बापट यांनी त्यांना भरपूर मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अभिनयावर खुश होऊन रवी बापटनी त्यांना डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांची पदवी दिली. तेव्हाच अमोल कोल्हे यांनी ठरवलं कि आपण अभिनय त्रातच करिअर करायला पाहिजे.

त्यानंतर त्यांनी विविध नाटकात काम करायला सुरुवात केली. तसेच त्यांनी “अधुरी एक कहाणी”, “या गोजिरवाण्या घरात”, “वीर शिवाजी” अश्या मालिकांमध्ये काम केले आणि नितीन चंद्रकांत देसाई यांच्या “राजा शिवछत्रपती” या मालिकेमुळे त्यांना चांगली ओळख मिळाली.

या मालिके नंतर त्यांनी छत्रपती संभाजीराजे देखील लोकांना कळावे यासाठी स्वतःचे घर विकून आणि आतापर्यंत कमावलेले पैसे वापरून “स्वराज्य रक्षक संभाजी” हि मालिका बनवली स्वराज्य लोकांना कळावं यासाठी धडपड करणारे अमोल कोल्हे यांची मालिका आज लोक आवडीने पाहतात. अश्या या कलाकाराला भन्नाटरे.कॉम चा सलाम आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

Leave a Reply