स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील हे कलाकार दैनंदिन जीवनात कसे दिसतात आणि काय करतात?

आपण सारे दररोज न चुकता ९ वाजता ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ हि मालिका पाहतो. हि मालिका सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पाहिली जाते त्यामुळे हि मालिका खूप लोकप्रिय झाली आहे. या मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जीवन प्रवास कसा होता हे दाखवल आहे. संभाजी महाराजांची भूमिका डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारली आहे हे आपल्याला माहित आहे, परंतु आज त्याच मालिकेतील इतर कलाकार दैनंदिन जीवनात कसे दिसतात याची माहिती घेऊ.

शंतनू मोघे (छत्रपती शिवाजी महाराज) : स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका शंतनू मोघे यांनी अगदी हुबेहूब साकारली आहे. शंतनू मोघे हे हुबेहूब शिवरायांसारखे दिसणारे आणि त्यांचा आवाजसुद्धा एकदम शिवाजी महाराजांच्या पात्राला शोभतो. तसेच त्यांनी केलेली शिवाजी महाराजांची वेशभूषा आपल्याला शिवरायांची आठवण करून देते. शंतनू मोघे हे एक इंजिनिअर आहेत, त्यांनी सिंहगड कॉलेज पुणे येथून आपले इंजिनिअरिंग पूर्ण केलेले आहे. तसेच ते एक मॉडेल देखील आहेत.

स्नेहलता वसईकर (महाराणी सोयराबाई) : स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये महाराणी सोयराबाईंची भूमिका स्नेहलता वसईकर यांनी उत्कृष्टरित्या साकारली आहे, त्यांच्या बद्दल लोक द्वेष व्यक्त करतात परंतु ती भूमिकाच तशी आहे. सोयराबाईंनी आणि मंत्र्यांनी केलेले शंभूराजेंविरूद्ध षडयंत्र आणि शिवरायांच्या मृत्यूबाबत त्यांना दोषी ठरवले आहे. या पात्राचा जरी लोक करत असेल तरी खऱ्या आयुष्यात त्या खूप चांगल्या आणि सुंदर आहेत.

अश्विनी महांगडे (राणूअक्का) : शंभूराजांची बहीण म्हणून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये अश्विनी महांगडे यांनी राणूअक्काचे पात्र अगदी हुबेहूब साकारले आहे. दिलेरखानाने जेव्हा राणूअक्काना आणि शंभूराजांना जेव्हा पकडेल होते तेव्हा त्या खंबीरपणे शंभूराजांच्या सोबत होत्या त्याच बरोबर शंभूराजांना पन्हाळगडावर अटकेचा जो कट होता त्यांना राणूअक्कानी जोरदार विरोध केला. अशी दमदार भूमिका साकारणाऱ्या अश्विनी महांगडे खऱ्या आयूष्यात खूपच सुंदर दिसतात.

महेश कोकाटे (अनाजी पंत) : स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमधील सगळ्यांना न आवडणारं पात्र म्हणजे अनाजी पंत यांचे पात्र. हे पात्र महेश कोकाटे यांनी असे साकारले आहे कि लोकांना खरोखरच ते अनाजी पंत वाटत आहेत आणि त्यामुळे लोकांच्या रोषायला त्याना सामोरे जावे लागत आहे. लोक त्यांना सोशल मीडिया द्वारे त्यांचे मिम्स बनवून त्याना ट्रोल करत आहेत. त्यांची वेशभूषा आणि बोलण्याची पद्धत आणि भूमिका आकर्षक वाटते. ते खऱ्या आयुष्य खूप चांगले आहेत.

सौजन्य: nmjweb.info

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply