सुपरस्टार “रजनीकांत” यांची लाइफस्टाइल पाहून तुम्ही देखील व्हाल आश्चर्यचकित!

12 डिसेंबर 1950 रोजी गरीब मराठी कुटुंबात जन्मलेल्या “रजनीकांत” यांनी कठोर परिश्रम करून फिल्म उद्योगतात प्रवेश करून आपल्या सशक्त अभिनय आणि अनोख्या स्टाइल मुळे सिनेसृष्टित एक असे स्थान प्राप्त केले आहे कि ते आज सिनेसृष्टीतले सुपरस्टार नव्हे तर मेगास्टार म्हणून ओळखले जातात. रजनीकांत हे आज वयाच्या 69 व्या वर्षी देखील फिल्म इंडस्ट्रीला सुपरहिट चित्रपट देत आहेत. त्यांचा प्रत्येकी चित्रपट बॉक्सऑफिस वर भरघोस कमाई करतो. कारण त्यांची लोकप्रियता भारतातच नव्हे तर परदेशात देखील प्रचंड प्रमाणात आहे.

रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचा अंदाज़ या गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की जेव्हा रजनीकांत यांचे चित्रपट प्रदर्शित होणार असतात तेव्हा त्यांचे चाहते काफी पाच वाजल्यापासुनच सिनेमागृहात प्रचंड गर्दी करतात. शिवाय त्यांच्या पोस्टर्स वर दुधाचा अभिषेक देखील करतात.

रजनीकांत यांच्याकडे संपत्तीची कमतरता नाही. काही दिवसांपूर्वी फोर्ब्सने भारतातील सर्वाधिक कमाई करणार्या सेलिब्रिटीजची यादी जाहीर केली होती, ज्यात रजनीकांत यांच देखील नाव टॉप वर आहे. परंतु रजनीकांत यांची ही एक खासियत आहे की ते भारतीय सिनेसृष्टीतले मेगास्टार असुन सुद्धा त्यांना अहंकार नाही.

रजनीकांत नेहमीच सर्वांशी नम्रपणे वागतात आणि नेहमीच अत्यंत साधे आयुष्य जगतात. जरी रजनीकांत यांना पडद्यावर कितीही स्टाइलिश दाखवण्यात येत असले तरी रजनीकांत वास्तविक जीवनात साधा धोती कुर्ता पेहराव करतात. आणि जेवण देखील अतिशय साधे जेवतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.