सिंधुताई सपकाळ यांच्या बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहे का?

सिंधुताई सपकाळ : अनाथांच्या माई विषयी माहिती परिचय

सिंधुताई सापकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ ला महाराष्ट्र मधील वर्धा जिल्ह्यात झाला. त्यांचा विवाह वयाच्या ९व्या वर्षी त्यांच्याहून २६ वर्षानी मोठा असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी अतिशय सासुरवास झाला होता. हे सर्व आपण त्यांचा आलेल्या चित्रपटात पाहिलेले आहे आणि खरच हे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे. खरच हे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे.

कारण आता आपण आपल्या आयुष्यात कोणतीही समस्या आली की, आपण लगेच गांगरून जातो, हताश होतो पण सिंधुताई सपकाळ ही खरच अशी व्यक्ती आहे ज्यांनी दुखाचे डोंगर सर करून स्वतचेच दुख बाजूला न सारता अनाथ मुलांच्याही डोक्यावर हात फिरवून मायेची सावली दिली.

खडतर अभ्यासासाठी प्रवास

त्याकाळी सिंधुताईच्या घरातले वातावरण असे होते की, मुलगी शिकतेय किवा शिक्षणाविषयीच्या संबधित काही ही गोष्टी घरात मिळाल्या तरी त्यांना मार खावा लागायचा. पण सिंधुताईना वाचनाची फार आवड होती, त्यामुळेच त्या जंगलात, लाकूडफाटा, शेण वैगरे गोळा करताना जे काही मिळायचे ते घरी आणून गपचूप उंदराच्या बिळात लपवून ठेवत असत आणि क्वचित घरात असल्या की ते त्या वाचून काढत असत.

आयुष्याचा संघर्ष लढा

अठरावर्षा पर्यंत माईंची तीन बाळतपण झाली आणि चौथ्यांदा गर्भवती असताना त्यांच्या आयुष्यातला संघर्ष चालू झाला. त्यावेळी गुरे पाळणे हाच व्यवसाय होता. गुरे शेकड्यांनी असायची त्यामुळे त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे त्या अर्धमेल्या वायच्या पण त्यांना त्याबदल्यात काहीच मोबदला मिळत नसे.

परंतु या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे पण रस्त्यावर मुरूम फोडांनार्‍याना मोबदला मिळायचा या बदल्यात्च सिंधुताईंनी बंड पुकारले. आणि हा संघर्ष त्या जिंकल्या त्यामुळे या लिलावात ज्यांना मोबदला मिळायचा त्यांना तो मिळणे बंद झाले. पण याची मोठी किमत त्यांना मोजावी लागली कारण एखाद्या बाईचे इतके मोठे धाडस त्याकाळच्या सावकार आणि जमीनदार मंडळींना पटले नाही.

सगळ्याशी झगडून अखेर पाया रोवला

सिंधु ताई इतके धाडस करता आहेत हे तिथल्या एका दमडाजी नावच्या जमीनदाराला पटले नाही म्हणून त्याने असा खोटा प्रचार केला की, सिंधुताईच्या पोटात जे मूल आहे ते आपले आहे, त्यामुळे त्यांच्या नवर्‍याच्याही मनात त्यांच्या विषयी चारित्र्याचा संशय निर्माण झाला त्यामुळे त्यांना त्यांनी बेदम मारले आणि मग गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून गोठ्यात आणून टाकले.

त्या अवस्थेत त्यांना कन्या जन्माला आली नवर्‍याने हकलले त्यानंतर गावाने ही हकलले त्या अवस्थेत त्या माहेरी आल्या, पण माहेरूनही कोणाची साथ मिळाली नाही. रेल्वे स्टेशनवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. काही तरी खायला हाथी लागेल म्हणून त्या रेल्वेरुळाच्या कडेला फेर्‍या मारायच्या.

किती तरी वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला पण लहान मुलीचा जर जीव घेतला टर पाप लागेल म्हणूनच त्यांनी हा विचार कायमचा सोडला आणि मग ताठ मानेने जगायचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी जरी दिवस भर जरी भीक मागितली तरी एकट्याने कधीच खाले नाही सर्वांना मिळून मिसळून व आपल समजून एकत्र खायचे. एवढेच नव्हे तर स्मशानात राहून दिवस काढले. त्यांनी अनाथ मुलांना ही सांभाळले.

पुरस्कार

  • अनाथ मुलांना सांभाळल्यामुळे त्यांना सामाजिक कार्यकर्त्या पुरस्कार
  • २५८ राष्ट्रीय आणि काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार
  • डॉ. बाबा साहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)
  • २००८ साली दैनिक लोकमतचा सह्याद्री हिरकणी पुरस्कार

आपल्याला यातुन काय प्रेरणा मिळाली

आताच आपण सिंधुताई विषयी इतके वाचले, तर यातून हे शिकायला मिळते की चौथी पर्यंत शिकलेली सिंधुताई समाजाला अंधारातून वाचवण्यासाठी किती संघर्ष करते आणि समाजाने जरी तिला दूर लोटले तरी तीने मात्र पूर्ण समाजाला एकत्र आणून वेळ प्रसंगी अनाथाची माई बनून त्यांच्यावर मायेची फुंकर घातली.

ज्याला कोणीच नाही त्यांना माई आहेत असे मला वाटते कारण बावीस वर्षापूर्वी एकाच कुटुंबातली तीन भावंडाची आई वारल्यामुळे ताटातुट झाली आणि ती भावंड वेगवेगळ्या अनाथआश्रमात गेली पण या भावंडांना जेव्हा शोधण्यात आल तेव्हा ती भावंड सिंधुताईच्या अनाथ आश्रमात मिळाली आणि ही भेट दूरदर्शनवर ही दाखवण्यात आली आणि हे सर्व शक्य सिंधुताई सारख्या कणखर महिलेमुळेच झाले. सिंधुताई कडून हेच शिकायला मिळते की संकटाला कसे तोंड देता आल पाहिजे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply