मोबाईल आणि कंप्यूटर वापरणाऱ्यांनो ही बातमी नक्की वाचा, नाही तर पश्चाताप होईल

मित्रांनो, मान्य आहे की, संगणक तुमचा चांगला मित्र आहे. तो तुम्हाला बऱ्याचशा कामांमध्ये मदतही करतो. तुमच्याबरोबर खेळतो, गातो, प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मदत करतो; पण काही बाबतीत हा अगदी घातक आहे बरं का! तुम्ही खूप वेळ संगणकापुढे बसत असाल, तर डोळे खराब झालेच म्हणून समजा. इतके की, यामुळे डोळ्यात पाणी येणंही बंद होतं. डोळे अगदी कोरडे पडतात. डोळ्यातली आर्द्रता कमी होते आणि त्याचे खूप घातक परिणाम समोर येतात. म्हणून आतापासूनच काळजी घ्या बरं.

निकृष्ट दर्जाचे गैजेट्स वापरू नका

हा धोका प्रामुख्याने निकृष्ट दर्जाचे मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापरल्यास होतो. चांगल्या दर्जाच्या संगणकात डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी विद्युत तरंग नियंत्रित करणारे ब्लॉकर्स बसवले जातात. मात्र निकृष्ट आणि दर्जाहीन संगणक या सुविधेने युक्त नसतात. म्हणूनच काळजी घ्यायला हवी.

लक्षणेसतत अशा प्रखर उजेडात राहिल्यास डोकेदुखी, मळमळणे, डोळ्याची जळजळ, डोळे लाल होणे, अशा अनेक समस्या जाणवतात. तुम्ही मुले या गोष्टी आई-बाबांना सांगत नाही आणि मग कधी तरी त्रास वाढतो. तेव्हा याची लक्षणेही ओळखा. डोळे खाजल्यासारखे झाले, सतत पाणी येत राहिलं, डोळे जळजळल्यासारखं वाटलं अथवा काही टोचल्यासारखं वाटलं, तर हा त्रास दुर्लक्ष करण्यासारखा नाहीच मुळी. त्यावर इलाज करायला हवा.

हे टाळण्यासाठी काही खबरदारीही घ्या

सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्क्रीनचा ब्राईटनेस कमी करा. सतत पापण्यांची उघडझाप करत राहा. यामुळे चिकटपणा कायम राहतो. स्क्रीनकडे बराच वेळ एकटक पाहू नका. अंधारात अथवा कमी प्रकाशात संगणकावर काम करू नका. आणि मित्रांनो, दर अध्र्या तासाने संगणकापुढून उठाच. आवश्यकता असेल, तर आयड्रॉपही मदतीला येतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू. 
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply