शिवजयंती निमित्ताने समाज बोध देणारा छोटासा लेख….

इतिहास विसरणारे इतिहास घडवत नाही |
तर इतिहास घडवणारे कधी इतिहास विसरत नाही | 
हाच एक इतिहास आहे !!

आज मी शुभम दिपकराव सुर्यवंशी माझे मत मांडत आहे तरी कोणाला ते पटले तर Share केल तरी चालेल आणि ज्यांना नाही पटले त्यांनी आपले मत मांडण्याचे कष्ट घेऊ नये..कारण प्रत्येकाला आपल्या गोष्टी योग्य वाटतात तसेच मलाही माझे मत योग्यच वाटते.

आजची पिढी ही स्वतः काही चांगले काम करुन दाखवण्यापेक्षा इतिहासात महान लोकांनी केलेल्या आणि दिलेल्या महान शिकवणूकीला आचरणात आणण्याचे सोडून समाजकारण करण्यात भरकटत जात आहे. जातीभेदातून दंगली उसळून महान पुरूषांना लाजवेल असे कृत्य करणारी आजकालची जनता. याच खर कारण म्हणजे महान लोकांचे कार्य काय होते ? महान लोकांनी केलेल्या लढाया कोणासाठी केल्या याची जाणीव नसणं, महान व्यक्तींचे चरित्रच ज्ञात नसणे हे आहे.

आजच्या युगात जनता हे विसरत जात आहे कि स्वराज्य स्थापनेसाठी महान व्यक्तीनी जात-धर्म भेदभाव करून नाही तर एकात्मता बाळगुन सर्वानी एकजुटीने लढून मिळवले आहे आणि याचा विसर आजच्या जनतेला पडलाय याचमुळे जातीभेदाचा हैदोस मांडलेला आहे.

खरच जर तुम्ही एखाद्या महान व्यक्तीला मानतात तर आधी त्यांना समजणे खुप महत्वाचे आहे आणि त्यांना समजून घ्यायला त्या प्रत्येक महान व्यक्तीचे चरित्र, शिकवण, त्यांची व्यक्तीरेखा वाचुन आचरणात आणणे महत्वाचे आहे.

हे केले तरच आपला भारत देश एक राहू शकतो नाहीतर सध्याची फॅशन आहे कि महान व्यक्तींची जयंती आली कि मोठमोठ्याने D.J. वाजवायचे ,गाड्यांना झेंडे बांधून मोठ्याने कर्कश हार्न वाजवत गावभर फिरायचे, घोषणा द्यायच्या.

आता तर अजून एक ट्रेन्ड आलाय Facebook आणि What’s App वर, ती अशी कि “आपला प्रोफाईल फोटो म्हणुन त्या महान व्यक्तींचा फोटो दोन दिवस ठेवावे कारण या साली सर्वात जास्ती सारखे प्रोफाईल म्हणजे एका वक्ती चे फ़ोटो म्हणून Guinness Book of World Record मधे नोंद होणार आहे… पुढे पाठवा…”

मी म्हणतो हे असले संदेश पाठवून एखाद्या महान व्यक्ती विषयी खोटा आदर दाखवण्याचा देखावा कशासाठी?? करायचेच असेल तर महान व्यक्तींना Tributes म्हणुन त्यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीला त्यांचे चरित्रावर असणारे ग्रंथ, पुस्तक वाचायला घ्या.

आणि फक्त वाचु नका तर त्या महान व्यक्तींची शिकवण आचरणात आणायला शिका मग खर्या अर्थाने महान व्यक्तींना आनंद भेटेल स्वर्गातून बघुन कि “माझ्या केलेल्या कार्याचा चांगल्या प्रकारे उपयोग केला जातोय, त्यावर समाज कारण नाही तर समाज व्यवस्थापण होते आहे, दंगली-भांडण करून देशाचे नुकसान करणे नाही तर भाईचाराने देश घडविला जात आहे.” 

असो हे तर माझे मत मी मांडले कारण सध्या माझ्या भारताला एकात्मतेची गरज आहे आणि याउलट येथील रहिवासी करत आहेत याचाच विचार करून खुप वाईट वाटते. 
धन्यवाद….

-शुभम दिपकराव सुर्यवंशी
Facebook

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply