छत्रपती उदयनराजे भोसले यांचा मोठा निर्णय!

जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पूर्ण देश हळहळला आहे. सर्व देश शहीद जवानांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे. याच पार्श्वभूमीवर आता साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. उदयनराजे यांनी कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे.

या पत्रात त्यांनी वाढदिवस येतील आणि जातील, पण आज जवानांच्या दु:खात सहभागी होता यावं या भावनेतून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.

येत्या २४ फेब्रुवारीला उदयनराजेंचा वाढदिवस आहे. परंतु यावेळी पुलवामा हल्ल्यामुळे वाढदिवस साजरा करण्याची त्यांची इच्छा नाही. यासंदर्भात उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून कळवले आहे. कार्यकर्त्यांनी साताराच नव्हे तर राज्यात कुठेही शुभेच्छांचे फलक लावू नयेत, इतकेच नाही तर, हार-पुष्पगुच्छ इत्यादी भेट देऊ नये असं आवाहन त्यांनी केलं आहे.

उदयनराजे यांनी पत्रात लिहिलं आहे की,’पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले. त्यांच्या कुटुंबावर किती मोठा आघात झाला, याची कल्पना न केलेली बरी. देश एका विशिष्ठ वळणावर येऊन ठेपला आहे. भारतीय जवान देशासाठी वीरमरण स्वीकारत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.

आम्हाला वाढदिवसाचं औचित्य फार नाही. वाढदिवस येतील आणि जातील, पण आज जवानांच्या दु:खात सहभागी होता यावं, या भावनेतून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.’

पुढे पत्रात लिहिण्यात आलं आहे की, ‘पुलवामा हल्ल्यामुळे ४४ पेक्षा जास्त जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबावर किती मोठा आघात झाला याची कल्पना न केलेली बरी. आज देश एका विशिष्ट वळणावर येऊन ठेपला आहे. भारतीय जवान असे वीरमरण केवळ देशाच्या सीमा अभेद्य ठेवण्यासाठी जवान स्विकारत आहेत.

त्यामुळे संपूर्ण देशाने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आम्हाला वाढदिवसाचं औचित्य फार नाही. वाढदिवस येतील आणि जातील. तथापी आजच्या घडीला जवानांच्या दु:खात सहभागी होता यावं या भावनेतून वाढदिवस साजरा न कऱण्याचा निर्णय घेतला आहे’.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply