मिठाचे हे फायदे आणि नुकसान तुम्हाला माहित आहेत का?

आपल्या दररोजच्या जेवणाचा मीठ हा एक अविभाज्य भाग आहे. मिठचा संतुलित वापर केला तर जेवण हे स्वादिष्ट बनते. पण हेच मीठ जर कधी गुणकारी असते तर कधी यामुळे तुमच्या शरीराला नुकसान पण होते. तर चला आज जाणून घेऊ या मिठाचे काही फायदे आणि नुकसान.

मिठाचा जेवणात वापर हा संतुलित असला पाहिजे. मिठाच्या कमी जास्त वापरामुळे शरीराला नुकसानपण होऊ शकते. Indian Spinal Injuries Centre नवी दिल्लीच्या वरिष्ठ आहारविषयक (dietician) डॉ. हिमांशू शर्मा यांच्या म्हणण्यानुसार सामान्य व्यक्ती दिवसभरात ९-१२ ग्राम पर्यंत मीठचे आहारात सेवन करतो. डॉ. म्हणण्यानुसार युवकांनी दिवसभरात ५ ग्रामपेक्षा जास्त मिठाचे आहारात सेवन करू नये.

मिठाचे फायदे:

त्वचेसाठी फायदेशीर: मीठामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम आणि ब्रोमाइड असते. मिठाचे पाण्याने हात-पाय धुतल्याने, मिठाचे पाणी त्वचेवरील अतिसूक्ष्म छिद्रामध्ये जाते आणि त्यामुळे त्वचेचा पृष्ठभाग साफ करते आणि त्वचेला नारोगी व चमकदार बनवते. जर आपले हात खूप घाण होत असतील किंवा हातावर डाग येत असतील तर मिठामध्ये हात रगडून आणि नंतर पाण्याने धुऊन साफ  करू शकतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या हाताला जर कोणतीही जखम असेल तर मीठ लावू नका. 

आयोडीनची कमतरता दूर करते: आयोडीनयुक्त मीठच्या सेवनाने शरीरात आयोडीनची कमतरता उद्भवत नाही. जर शरीरात आयोडीनची कमतरता असेल तर थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करत नाहीत. आयोडीन मीठ शरीरात गुड कोलेस्टेरॉल वाढवते. आयोडीनच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरात हायपोथायरायडिज्म सारखा आजार देखल होऊ शकतो.

पचनक्रिये मध्ये सहायक: संतुलित प्रमाणात मीठ पाण्यात टाकून मीठ पाणी पिल्याने ते पोटासाठी लाभदायी ठरते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. जर आपल्याला पचनविषयी समस्या असेल तर आपण नक्की मिठाच्या पाणी पिले पाहिजे. 

हाडाच्या त्रासांपासून मुक्ती: ऑस्टियोआर्थरायटिस आणि नसांवर येणाऱ्या सूज यांवरील उपचारात हे लाभदायी ठरते. मिठाचे पाणी सूज कमी करण्यासाठी मदत करते आणि वेदनेपासून अराम देते.

मिठाचे नुकसान: 

हाय ब्लड प्रेशर : तज्ञांच्या मते, उच्च बीपीचा (ब्लड प्रेशर) थेट संबंध मीठशी आहे. म्हणून आपल्या जेवणामध्ये मिठाचा कमी वापर करा. तसेच, जर आपल्याला जेवताना जेवणात मीठ कमी वाटत असेल तरी देखील जेवणात मीठ टाकू नका. लक्षात ठेवा की जास्त प्रमाणात मीठ केल्यामुळे आपले रक्त संचारानं आणि रक्तदाब खराब होऊ शकतो.

हृदयविकाराचा त्रास : असे म्हटले जाते की मीठ अति प्रमाणात वापरल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो. म्हणूनच, निरोगी हृदयासाठी आपण आपल्या अन्नातील प्रमाणात मीठाचा संतुलित वापर करावा.

निर्जलीकरण : शरीरामध्ये जास्त मिठामुळे निर्जलीकरण होण्याची समस्या येऊ शकते. शरीरात निर्जलीकरण टाळण्यासाठी आपण संतुलित प्रमाणात मीठ घ्या आणि भरपूर पाणी प्यावे.

पाणी धारणा : जेव्हा शरीरात मीठ प्रमाणापेक्षा जास्त होते तेव्हा शरीरातील पाणीचा संचय वाढतो. या स्थितीला पाणी धारणा म्हणतात. या परिस्थितीत हात, पाय आणि चेहरा सुजतात. यामुळे त्वचापण सूजते. म्हणून शरीरात मीठ किती प्रमाणात ठेवायचे हे लक्षात ठेवून भरपूर पाणी प्यावे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

Leave a Reply