पुण्याच्या या तरुणाने दुबईमध्ये जाऊन असं काय केलं… की आज त्याच्याकडे आहे लँड क्रुझर गाडी

अंगावरच्या कपड्यानिशी निघालेल्या पुण्याच्या या तरुणाने दुबईमध्ये जाऊन असं काय केलं… की आज तो फिरतोय स्वतःच्या लँड क्रूझर गाडीतून…..!

दुबई… एक संधींचा देश ….,आजवर अनेक जण इथे येऊन ,आपापल्या परीने कमवुन धनप्राप्ती करुन घेत असतात.येथे अनेक संधी उपलब्ध असल्या ,तरी त्या संधींचं सोनं करणं मात्र ,ज्याच्या त्याच्या कार्यक्षमतेवर व मनोबलावर अवलंबून आहे.

पुण्याचा एक तरुण, अंगावरच्या कपड्यानिशी दुबईमध्ये जातो काय, आपल्या अनुभवाचे कौशल्य तिथे पणाला लावतो काय, आणि यशस्वी उद्योगपती होतो काय. सारंच स्वप्नवत वाटणारं, पुण्याच्या पिंपरी-चिंचवडचा हा तरुण, “सचिन कचरे पाटील ” संधींची सुवर्ण खाण असलेल्या दुबईमध्ये नशीब आजमावायला आला आणि प्रचंड आत्मविश्वास व जिद्दीच्या बळावर यशस्वी उद्योजक झाला.

याने पुणे विद्यार्थी गृहातून प्रिंटिंग इंजिनिअरिंगची पदवी घेतली, टाटा प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, प्रिंट हाऊस, सकाळ पेपर सारख्या ठिकाणी काही वर्षे नोकरीचा अनुभव घेत पुढच्या संधीसाठी प्रयत्न सुरु ठेवले. सततच्या जिज्ञासू वृत्ती मुळे ऑनलाईन सर्च करत असताना, 2008 साली दुबईमध्ये प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून जॉब ची संधी मिळाली.

दोन वर्षात त्याचा टेक्निकल अनुभव पाहुन इटालियन पेपर मिलने, टेक्निकल एक्सपर्टहेड म्हणून अपॉईंट केले. येथूनच या तरुणाच्या करिअरने वेगळे वळण घेतले. आता मात्र मनात स्वतःचे काही सुरू करण्याची जिद्द निर्माण झाली. तिथे असलेल्या मराठी लोकांनी, या मराठी तरुणाची उमेद पाहून, खूप चांगले सहकार्य केले.

ज्यांची मोनोपोली आहे ,त्यामध्ये 90% मुंबईचे प्रॉडक्शन मॅनेजर आहेत. तेथील एजन्सीने या तरुणाने तयार केलेला पेपर आता ब्रांड म्हणून मार्केटमधे आणला. ही या तरूणांसाठी खूप मोठी सुवर्णसंधी ठरली. आज त्याचा पेपर ‘अटलांटिस हॉटेल’, ‘बुर्ज खलिफा’, पासून ते दुबईतल्या सर्व सेवन स्टार्स, फाइव्ह स्टार्स हॉटेल्सना पुरवला जातो.

दुबईतील या औद्योगिक यशामागचे रहस्य विचारताच, “सचिन कचरे पाटील ” म्हणाले… “माझ्या यशात दुबईमधील व्यवस्थापनाचा, सरकारचा, इथल्या शिस्तबद्धतेचा व ट्रांसपोर्टेशनचा प्रचंड सहभाग आहे. इथे शून्य भ्रष्टाचार, शंभर टक्के डिसिजनमेकिंग व सर्वांना समान संधी दिल्या जातात.

त्यामुळे मी महाराष्ट्रातील तरुणांना आवाहन करेन, की काही करण्याची जिद्द मनात असेल, मनगटात कष्टाची ताकद असेल ,तर जरूर दुबईत या. उद्योग म्हटलं की भांडवलाचा बाऊ केला जातो. परंतु सच्च्या मनाने मेहनतीने कोणतेही काम करायला घेतले की, अक्षरश: काही दैवी शक्ती अनेक रूपांनी आपल्याला मदतीचा हात देतात व आपण ठरवलेला टप्पा सहज पार करण्यास मदत करतात. हा माझा स्वानुभव आहे”.

पिंपरी चिंचवड मधील अंगावरचे कपडे ,व घरच्यांचा आशीर्वाद एवढेच भांडवल घेऊन निघालेला हा तरुण आज दुबईतील एक यशस्वी पेपर ट्रेडिंग व्यवसायिक आहे. त्याच्याजवळ त्याची स्वतःची लँड क्रूझर ही आलिशान गाडी आहे. आजच्या तरुणांना मार्गदर्शन करताना ते म्हणतात, “संधीचा डोंगर असलेल्या या देशात तुम्हाला अनेक संधी मिळतीलच, पण त्याचे सोने करणे मात्र तुमच्या हातात आहे…!!!”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

 

Leave a Reply