गोलंदाज रोहित शर्माचा अपघाताने असा झाला ‘हिटमॅन’

फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा रोहित शर्मा अपघाताने फलंदाज झाला आहे. त्याने गोलंदाज म्हणून क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती.

भारताचा हिटमॅन रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा रोहित शर्मा अपघाताने फलंदाज झाला आहे.

रोहित शर्माने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला एक गोलंदाज म्हणून सुरुवात केली होती. रोहित शर्मा भारताच्या ज्युनिअर संघात क्रिकेट खेळत होता.

2005 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर असताना रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला गोलंदाजी करता येत नव्हती. त्यावेळी गोलंदाज म्हणून त्याची कारकिर्द संपुष्टात आली.

गोलंदाजी करायला अडचण आल्यानंतर रोहितने फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं. त्यानंतर मात्र, रोहितने मागे वळून पाहिलं नाही.

भारताकडून क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक करणाऱ्यांमध्ये रोहित शर्माचा समावेश आहे. त्याच्याशिवाय अशी कामगिरी केवळ सुरेश रैना आणि केएल राहुल यांनी केली आहे.

लेखकाने वयक्तिक अभ्यास करून मांडलेली माहिती आहे. याचा Bhannatre.com शी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply