‘सैराट’फेम आर्चीचा नवीन लूक व्हायरल; पाहा व्हायरल फोटो…

सैराटफेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरुचा नवीन लूक सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

रिंकू राजगुरुचा कागर नावाचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. व्हेलेंटाईनच्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता, मात्र रिंकूच्या परिक्षांमुळे सिनेमाची तारिख पुढं ढकलण्यात आल्याचं कळतंय.
रिंकू राजगुरुने सैराट सिनेमात सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर तिला त्याच सिनेमाच्या कन्नड रिमेकमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली.

दरम्यान, कागरशिवाय रिंकूच्या हातात आणखी काही प्रोजेक्ट असल्याचं कळतंय. नागराज मंजुळेच्या आगामी झुंड सिनेमात देखील ती झळकणार असल्याचं कळतंय.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.