भारतातील ही १० सर्वात श्रीमंत शहरं तुम्हाला माहित आहेत का?

भारत हा जगातील सर्वात वेगवान अशी अर्थव्यवस्था असलेला देश आहे.

कठोर परिश्रम आणि एकाग्रता हे फळ आहे. आम्ही आपणास भारतातील दहा मोठ्या शहरांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.

विशाखापट्टणम हे शहर आंध्रप्रदेशचे औद्योगिक केंद्र आहे. हे शहर स्टील प्लांट, बँकिंग आणि आय. टी साठी प्रसिद्ध आहे. या शहराचा जी. डी. पी. 26 मिलियन डॉलर आहे. या यादीत हे शहर दहाव्या क्रमांकावर येते.

गुजरातचे सुरत शहर हे डायमंड कटिंग आणि टेक्सटाइल इंडस्ट्रीजसह स्टील आणि पेट्रोकेमिकल साठी प्रसिद्ध आहे.
जवळजवळ ४० बिलियन डॉलरची उलाढाल असलेले हे शहर नवव्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रातील पुणे शहर हे आयटी, शिक्षण, कापड उद्योग आणि साखर उद्योगात अग्रथानी आहे. या शहराचा जी. डी. पी. ४८ बिलियन डॉलर आहे. हे शहर श्रीमंत शहरांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.

गुजरातमधील अहमदाबाद हे शहर श्रीमंत शहरांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. या शहराचा जी. डी. पी. ६४ बिलियन डॉलर आहे.

दक्षिण भारतातील चेन्नई हे शहर शिक्षण, उद्योग, अर्थ आणि संस्कृतीचं मोठं केंद्र आहे. हे शहर ऑटोमोबाईल, तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रातील प्रगत शहर म्हणून ओळखल्या जाते. या शहराचा जी. डी. पी. ६६ बिलियन डॉलर आहे.

हैद्राबाद हे शहर प्राचीन काळी हिरे यांनी मोतीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले शहर होते. मात्र आता हे शहर शिक्षण आणि संशोधन या करिता प्रसिद्ध आहे. या शहराचा जी. डी. पी. ७४ बिलियन डॉलर आहे.

पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता हे शहर सांस्कृतिक परंपरा आणि शिक्षण या साठी प्रसिद्ध आहे. या शहराचा जी. डी. पी. १५० बिलियन डॉलर आहे.

भारताची राजधानी दिल्ली हे शहर १६७ बिलियन डॉलरचा जी. डी. पी. असलेले शहर आहे. हे शहर दक्षिण आशियातील श्रीमंत शहरांपैकी एक आहे.

भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणारं मुंबई हे शहर देशातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत पाहिल्या स्थानावर आहे. या शहराचा जी. डी. पी. २०९ बिलियन डॉलर आहे. हे शहर विज्ञान विषयक संशोधन या करिता प्रसिद्ध आहे.

ही होती भारतातील सर्वात श्रीमंत शहरांची माहिती.

वरील दिलेली माहिती पूर्णपणे बरोबरच असेल असं नाही. ते लेखकाने वयक्तिक अभ्यास करून मांडलेली माहिती आहे. याचा Bhannatre.com शी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply