सर्दी – खोकल्यावर रामबाण उपाय

थंडीच्या दिवसांमध्ये तापमान सतत कमी-जास्त होत असताना कितीही काळजी घेऊनही सर्दी किंवा खोकला होतोच. याची वेळीच काळजी न घेता औषधोपचार केले गेले नाहीत, तर खोकला वाढत जाण्याची भीती असते. त्यातूनच मग घश्यामध्ये सूज, स्वास घेण्यास त्रास होणे, घसादुखी, आणि नाक बंद पडणे या सारख्या समस्या उध्दभवू शकतात. आपण यावर तात्पुरता उपचार म्हणून मेडिकल वरील औषधे घेतो आणि आपल्याला तात्पुरते बरे पण वाटते, परंतु या औषधांच्या नेहमी वापरामुळे शरीरावर यांचे ‘साईड इफेक्ट्स’, म्हणजे थोड्या फार प्रमाणात दुष्परिणामही होऊ शकतात. ते दुष्परिणाम म्हणजे काहीबाही खाण्याची इच्छा न होणे, सुस्ती वाटणे, तोंडाची चव जाणे, सतत झोप येणे. या दुष्परिणामांना टाळायचे असेल तर आणि सर्दी खोकला पूर्णपणे बरा करायचा असेल तर आयुर्वेदिक उपचार म्हणजे घरच्या घरी काढा तयार करून त्याचे सेवन करणे.

हा काढा बनविण्यासाठी तुम्हाला जे साहित्य लागेल ते तुमच्या घरी नक्कीच उपलब्ध असणारे आहे. यासाठी तुम्हाला दोन ग्लास पिण्याचे स्वच्छ पाणी, थोडे काळे मिरे, दोन ते तीन लवंगा, दोन ते तीन हिरवे वेलदोडे, काळ्या तुळशीची काही पाने, थोडे आले, चवीनुसार गूळ आणि चहाची थोडी पावडर या वस्तू आवश्यक आहेत.

 

या काढ्यामध्ये घालण्यासाठी काळे मिरे, लवंगा, आणि वेलदोडे थोडेसे कुटून घ्यावेत, तसेच आले किसून घ्यावे. हा काढा तयार करण्यासाठी पाणी उकळत ठेवावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये कुटलेले काळे मिरे, लवंग, वेलदोडे, आले आणि गूळ घालावे. हे मिश्रण काही सेकंद उकळू दिल्यानंतर त्यामध्ये तुळशीची पाने घालावीत. त्यानंतर सर्वात शेवटी चहाची पूड यामध्ये घालून हे मिश्रण अर्धे राहीपर्यंत उकळत ठेवावे.

काढा उकळून अर्धा झाल्यावर गॅस बंद करावा आणि हा काढा गाळून घ्यावा. हा काढा सेवन करण्यासाठी तयार आहे. हा काढा गरम असतानाच प्यावा. या काढ्याचे सेवन दररोज केल्याने काही दिवसातच सर्दी खोकला संपूर्ण बरा होतो. तसेच या काढ्याचे इतर कोणतेही दुष्परिणाम नसल्याने लहान मुलांना देण्यासाठी देखील हा काढा चांगला आहे.

टीप: हा लेख मानसी टोकेकर यांनी लिहिलेला आहे. या लेखाचे पूर्ण अधिकार मानसी टोकेकर यांच्याकडे राखीव आहेत. आम्हाला हा लेख आवडला म्हणून आम्ही हा bhannatre.com वर लेखकाच्या प्रदर्शित केला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

One Comment

Leave a Reply

Leave a Reply