सावधान! तुम्ही देखील प्लॅस्टिक बॉटल्‍समधून पाणी पिता का?

समज-गैरसमज, कन्‍फ्युजन, शंका प्रेमाविषयी असतील तितकेच समजगैरसमज प्‍लास्टिकच्‍या वापराविषयी आहेत. प्लॅस्टिक बॉटल्‍स, कॅरीबॅग, वस्‍तू यांचा वापर करावा कि करू नये याविषयी अनेकांच्‍या मनात गोंधळ असतो. विशेष म्‍हणजे जितका प्रेमाविषयी सल्‍ला देण्‍यास लोक कचरतात तितकेच ते प्‍लास्टिकविषयी सांगण्‍यासही कचरतात. कारण बहुतांश जणांना प्‍लास्टिकचा वापर न करणे किंवा त्‍याऐवजी पर्यायी वस्‍तूचा वापर करणे अवघड जाते. मात्र येथे आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की, कोणत्‍या प्‍लास्टिकचा वापर करणे टाळले पाहिजे.

ते तुमच्‍यासाठी धोकादायक ठरू शकतात. मात्र कोणत्‍या प्रकारच्‍या प्‍लास्टिकचा वापर करणे योग्‍य आहे, हे मात्र आम्‍ही तुम्‍हाला सांगू शकणार नाहीत. कोणीही तुम्‍हाला असे सांगू शकणार नाहीत. कारण प्रत्‍येक प्रकारच्‍या प्‍लास्टिकमध्‍ये कोणता ना कोणता घातक घटक म्‍हणजेच टॉक्सिक असू शकतो. जे हानिकारक असू शकतात.

त्‍यामुळे कोणत्‍याही प्रकारच्‍या प्‍लास्टिकचा वापर करणे टाळले पाहिजे. कारण शॉर्ट टर्ममध्‍ये हे जरी फायदेशीर असले तरी लॉंग टर्ममध्‍ये यामुळे नुकसान होते.

जर तुम्हाला प्लॅस्टिक वापरायचे असेल तर या गोष्टींची काळजी घ्या: 

रेज़ीन आइडेंटिफिकेशन कोड

प्‍लास्टिकच्‍या प्रत्‍येक डब्‍ब्‍यावर, कंटेनर, बादली आणि बॉटलवर एका त्रिकोणामध्‍ये एक नंबर दिलेला असतो. यालाच रेजीन आयडेंटिफिकेशन कोड म्‍हणतात. रेजीन म्‍हणजे ज्‍या पदार्थाने प्‍लास्टिक बनलेले आहे. बहुतांश वेळेस हा नंबर डब्‍बा आणि बॉटलीच्‍या खाली असतो. मात्र ब-याचदा हा नंबर वेगळ्या भागावरही असतो.

या कोड वरून प्‍लास्टिकचे ती वस्‍तू बनवण्‍यासाठी कोणत्‍या गोष्‍टीचा वापर केला गेला, हे आपण जाणून घेऊ शकतो. आणि यावरूनच प्‍लास्टिकची ती वस्‍तू वापरणे हानिकारक आहे की नाही, याची माहिती मिळते. मात्र लक्षात ठेवा हे कोड अधिकृतरीत्‍या सुरक्षीततेची पृष्‍टी करत नाही. 1 ते 6 कोड विशिष्‍ट ‘प्‍लास्टिक पॉलिमर’विषयी माहिती देतात. तर 7 या कोडमध्‍ये 1 ते 6 कोडमध्‍ये समाविष्‍ट नसलेल्‍या इतर सर्व प्‍लास्टिक्सचा समावेश असतो.

पॉलीथीन टेरेफेथलेट – (पीईटी किंवा पीईटीई किंवा पॉलिएस्टर)

रेज़ीन आइडेंटीफिकेशन कोड 1  (बहुतांश ठिकाणी PET किंवा PETE लिहिलेले असते) हे ‘प्‍लास्टिक पॉलिमर’ विशेष करून कापड उद्योगामध्‍ये वापरले जाते. यापासून बनणा-या कंटेनरमध्‍ये बाहेरचा ऑक्सिजन आतमध्‍ये जाऊ शकत नाही. यामुळे आतील अन्‍न सुरक्षित राहते. कोल्‍ड ड्रिंक्‍स बॉटल्‍स, जार, ओव्‍हन-ड्रे मध्‍ये या प्‍लास्टिकचा वापर केला जातो. जर या कंटेनर्समध्‍ये दीर्घकाळ एखादे द्रव्‍य ठेवल्‍यास त्‍यामध्‍ये अँटीमनी नावाचे रसायन स्‍त्रवते. विशेष करून गरम ठिकाणी कंटेनर ठेवलेले असल्‍यास हे रसायन जास्‍त प्रमाणात स्‍त्रवते.

दीर्घकाळ अँटीमनी ट्रायऑक्‍साईडच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींनी श्‍वास व त्‍वचेसंबंधी विकार आणि महिलांनी मासिक पाळी व गर्भपातामध्‍ये अडचण आल्‍याचे सांगितले आहे. मात्र अद्यापही पॉलिथीन टेरेफेथलेटमधून एवढे अँटीमनी ट्रासऑक्‍साइड निघते का, जे हानिकारक असेल, हे सिद्ध होऊ शकलेले नाही.

उच्‍च घनत्‍व असणारे पॉलिथीन (एचडीपीई)

रेज़ीन आइडेंटीफिकेशन कोड 2 (अनेक ठिकाणी HOPE लिहिलेले असते) प्‍लास्टिकमध्‍ये हे सर्वाधिक युझ होणारे ‘प्‍लास्टिक पॉलीमर’ आहे. प्‍लास्टिकच्‍या, दुधाच्‍या पिशव्‍या, औषधी, जूसचे कंटेनर्स अशा गोष्‍टी या प्‍लास्टिक पासून बनवलेले असतात.

अन्‍न आणि द्रव्‍या यांचे कंटेनर म्‍हणून तसे तर हे सुरक्षित मानले जाते. मात्र काही संशोधनातून हे समोर आले आहे की, उन्‍हामध्‍ये यामधून नोनिलफेनॉल हे रसायन स्‍त्रवू शकते. यामुळे हार्मोन्‍सच्‍या समस्‍या निर्माण होऊ शकतात.

पॉलीविनायल क्लोराइड (पीवीसी)

रेज़ीन आइडेंटीफिकेशन कोड 3 (अनेक ठिकाणी V किंवा PVC लिहिलेले असते) पॉलीथीन नंतर जगात सर्वाधिक वापरले जाणारे हे प्‍लास्टिक आहे. आरोग्‍य आणि पर्यावरणावर या प्‍लास्टिकचा गंभीर परिणाम होतो. खेळणे, शाम्‍पू, डिटर्जंट, क्‍लीनर, रक्‍ताच्‍या बॉटल्‍स, खिडक्‍यांचे फ्रेममध्‍ये यांचा वापर केला जातो.

यामध्‍ये घातक विषारी रसायन असतात. हवेच्‍या संपर्कात आल्‍याने इतरही घातक पदार्थ जसे की, पारा, शिसेही यामध्‍ये बनू शकतात. यामुळे याची निर्मिती आता थांबवण्‍यात आली आहे. पर्यावरणातील सर्व अन्‍न साखळीवर याचा विपरीत परिणाम होतो.  

कमी घनत्‍वाचे पॉलिथीन (एलडीपीई)

रेज़ीन आइडेंटीफिकेशन कोड 4 (बहुतांश ठिकाणी LDPE लिहिलेले असते) हे प्‍लास्टिक पातळ व फ्लेक्सिबल असते. ब्रेड, पेपर इत्‍यादी ठिकाणी याची पातळ फ्रेम (जसे मिठाईवर वापरले जाते) वापरली जाते. पदार्थाला बाहेरील वातावरणापासून सुरक्षित ठेवण्‍यासाठी याचा वापर होतो. टोमॅटो कॅचअप, केबलची वायर यामध्‍येही याचा वापर होतो.

अन्‍नपदार्थ आणि द्रव्‍य कंटेनर स्‍वरूपात हे सुरक्षित प्‍लास्टिक मानले जाते. मात्र सुर्यप्रकाशात हे दीर्घकाळ राहिल्‍यास यामुळे हार्मोनल प्रॉब्‍लेम्‍स होण्‍याची शक्‍यता असते. म्‍हणजेच याचा वापर कमीत कमी केला पाहिजे.

Source: DivyaMarathi

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply