भारताला भिऊन पाकिस्तानने घेतला मोठा निर्णय!

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. त्यानंतर जैश आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानची कोंडी करण्याचे भारताने जोरदार प्रयत्न केले आहेत. जैश ए मोहम्मदचा एक सूत्रधार रशीद गाझी याचा भारतीय जवानांनी खात्मा केला. भारत आणखी जोरदार कारवाई करेल या भीतीने पाकिस्तानने जैश ए मोहम्मद चे मुख्यालय स्वत:च्या नियंत्रणाखाली घेतले आहे. जैशचे मुख्यालय पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये आहे.

पाकिस्तानने दहशतवादी हाफीज सईदच्या दोन संघटनांवर बंदी घातल्यानंतर आता पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय ताब्यात घेतलंय. पाकिस्तानमधील पंजाब सरकारने बहावलपूरमधील मदरसातूल साबिर आणि जामा ए मस्जिद सुभानल्ला हा परिसर ताब्यात घेतलाय.

जैश ए मोहम्मद संबंधी कारवाईसाठी पाकिस्तानने एक प्रशासक नियुक्त केला असल्याचंही बोललं जातंय.

पंजाब सरकारने ‘जैश ए मोहम्मद’चे मुख्यालय आपल्या ताब्यात घेतल्याचे पाकिस्तानच्या गृह मंत्रालय प्रवक्त्याने सांगितले. पाकने आपला एक प्रशासकही तिथे नेमल्याचे ते म्हणाले. ही कारवाई गुरूवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एनएससी बैठकीच्या निर्णयानंतर केली गेली.

सध्या 600 विद्यार्थी या मुख्यालयात शिकत आहेत आणि 70 शिक्षक तैनात आहेत. पंजाब पोलीस या कॅंम्पसला सुरक्षा देत आहे.

पाकिस्तानने ही सर्व कारवाई सुरु केलेली असली तरी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे जगाला दाखवण्यासाठी ही कारवाई केली जात आहे का याबाबतही शंका निर्माण केली जात आहे.

भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद येत्या काळात जम्मू आणखी काही आत्मघाती हल्ले घडवण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. गुप्तचर यंत्रणांकडून नुकतच मिळालेल्या माहितीनुसार सध्या ‘जैश…’ आणखी एक मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत आहे.

या प्रकरणी सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, संबंधित धागेदोऱ्यांच्या बळावर आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न गुप्तचर यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply