पैशांच्या तंगीमुळे नवाजुद्दीन सिद्दीकीला कोथिंबीर विकून भरावे लागत होते पोट, स्वतः केला खुलासा

अपकमिंग फिल्म ‘ठाकरे’ चे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माचा शो ‘The Kapil Sharma Show’ मध्ये पोहोचला होता नवाजुद्दीन सिद्दिकी. तिथे आपल्या आयुष्यातील अनेक घटना त्याने सांगितल्या. त्याने सांगितले की, जूनियर आर्टिस्टपासून एक यशस्वी अॅक्टर बनण्यासाठी त्याला अनेक कठीण समस्यांचा सामना करावा लागला होता. आपल्या स्ट्रगलिंग डेजबद्दल बोलताना नवाजने सांगितले की, संघर्षाच्या काळात त्याला पैसे कमावण्यासाठी कोथिंबीरही विकावी लागली होती. त्यातही त्याला नुकसान झेलावे लागले होते.

सांगितला एक किस्सा…
– कपिलच्या शोमध्ये नवाजने आपल्या स्ट्रलिंग डेजदरम्यानचा एक किस्साही ऐकवला. त्याने सांगितले, ‘एकदा मी एका भाजीवाल्याकडून 200 रुपयांची कोथिंबीर विकण्यासाठी खरेदी केली. पण काही वेळातच ती कोथिंबीर पिवळी पडली. मी जाऊन त्या भाजीवाल्याला विचारले की, ही तर पिवळी पडली आता ही कोण खरेदी करेल. यावर तो म्हणाला की, कोथिंबीरीवर पाणी शिंपडावे लागते तरच ती ताजी राहते.

– नवाजने सांगितले, ‘कुणीच ती कोथिंबीर खरेदी केली नाही आणि 200 रुपयेही वाया गेले. त्यादिवशी पैसे नसल्यामुळे मला विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करावा लागला होता’.

याकारणाने पोहोचला होता दवाखान्यात…
कपिलने जेव्हा नवाजला विचारले की, तू तुझ्या भूमिकेत पूर्णपणे शिरतोस. त्याचा परिणाम कधी खऱ्या आयुष्यावर होतो का ?, नवाजने सांगितले, ‘फिल्म ‘रमन राघव’ मध्ये माझी भूमिका डार्क शेड वली होती आणि मला यातून बाहेर पाडण्यासाठी दवाखान्यात अॅडमिट व्हावे लागले होते’.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.