मुंबईच्या किनाऱ्या जवळ सापडले रहस्यमय तरंगते बेट, व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित व्हाल

मुंबईच्या समुद्रामध्ये तरंगते बेट दिसल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मध्ये एक पाण्यावर तरंगता जमिनीचा तुकडा दिसतोय हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. ही तरंगती गोष्ट जमीनीचा तुकडा आहे की इतर काही याबद्दल अद्याप कोणीही माहिती स्पष्ट होऊ शकलेली नाही.

या व्हिडिओमध्ये, समुद्रात एक मोठा जमिनीचा तुकडा दिसत असल्याचे बोटीतील एक मच्छीमार बोलताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे हे मच्छीमार मुंबईच्या किनाऱ्यापासून खूप लांब पर्यँत जात असतात पण आज त्यांना तेथे काही वेगळेच दिसले, ते म्हणजे एक भला मोठा जमिनीचा तुकडा पाण्यावर तरंगत आहे. परंतु हा तुकडा यापूर्वी इथे कधीच दिसला नाही आणि आज अचानक इथे कसा आला असे या व्हिडिओमध्ये मच्छीमार बोलतांना दिसत आहेत.

 mysterious floating island

हा तरंगता जमिनीचा तुकडा पाहून बोटीतील मच्छीमार आश्चर्यचकित झाले तर काहीजणांना या घडल्या प्रकारची भिती वाटल्याचे व्हिडीओमधील संवादामधून निदर्शनात येते. व्हिडीओमध्ये काहीजण ती तरंगणारी वस्तू नक्की काय आहे हे पाहून येऊयात असं म्हणताना ऐकू येत आहे तर काहीजणांनी घाबरून तिकडे जाण्यास नकार देत बोट पुन्हा किनाऱ्याकडे वळवण्यास सांगितल्याचेही व्हिडीओमधून समजते. विशेष म्हणजे मागील दोन दिवसांपासून हा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच कोणत्याही सरकारी यंत्रणेने या व्हिडीओसंदर्भात किंवा ती तरंगणारी गोष्ट काय होतं यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

एका अज्ञात व्यक्तीने ट्विटरवर हा अपलोड केलेला हा व्हिडीओ आता व्हॉट्सअपवर, फेसबुक आणि युट्युबवर व्हायरल होत आहे. मागील अनेक पिढ्यांपासून कोळी लोकं मुंबईमध्ये राहतात. त्यांच्यासाठी मुंबईच्या किनाऱ्यापासून आतमधील समुद्रही चांगलाच ओळखीचा आहे. असे असले तरी याआधी कधीही अशाप्रकारची एवढ्या मोठ्या आकाराची तरंगणारी रहस्यमय गोष्ट मुंबईतील समुद्रामध्ये पाहिलेली नाही. त्यामुळे या व्हिडीओचे गूढ आणखीन वाढले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.