डॉ. अमोल कोल्हे यांना मराठी विश्र्वभूषण पुरस्कार जाहीर

डॉ. अमोल कोल्हे यांना मराठी विश्र्वभूषण पुरस्कार जाहीर

प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरात मनामनात पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेते डॉ अमोल कोल्हे. अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास अखंड महाराष्ट्रातील जनतेपुढे झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यारक्षक संभाजी’ ह्या मालिकेतून दाखवत आहेत. ह्या मालिकेची पूर्ण जबाबदारी अमोल कोल्हे ह्यांनी घेतली होती. अमोल कोल्हे यांनी या मालिकेसाठी चक्क आपले घर देखील गहाण ठेवले होते. अमोल कोल्हे यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना मानाचा असा मराठी विश्र्वभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आपल्या अभिनयाने संभाजी महाराजांना परत एकदा जिवंत करून संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात त्यांनी पोहचविले.

अमोल कोल्हे त्यांच्या मते, जर स्पार्टन सारख्या छोट्याश्या लढाईचा एवढा भलामोठा सिनेमा होऊ शकतो. तर माझ्या राजाने एवढे दैदिप्यमान कार्य केले आहे ते काही लोकांना अजून माहीत नाही. मग ते लोकांपर्यंत यायलाच पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा एवढ्या वर्षांपूर्वीचा न उगडला गेलेला इतिहास या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या समोर परत एकदा घडतोय असे प्रेक्षकांना वाटते हेच या मालिकेचे यश आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

Leave a Reply