घरात सापडला Apple चा ३० वर्ष जुना कॉम्प्युटर, त्यानंतर झाले असे काही…

बालपणी वापरलेली एखादी वस्तू किंवा एखादं खेळणं आपल्याला जर सापडलं तर आपल्याला खूप आनंद होतो आणि आपण लहानपणीच्या आठवणीमध्ये रमून जातो. अमेरिकेत राहणारे प्राध्यापक जॉन फॅफ यांच्यासोबतही असंच काहीसं झालंय जे पाहून तुम्ही थक्क व्हाल. त्यांना त्यांच्या घराच्या जुन्या अडगळीच्या खोलीमध्ये ३० वर्ष जुना अ‍ॅपलचा कंप्युटर सापडला आहे. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हा कंप्युटर आता देखील चालू आहे.

Apple या कंपनीचे जगभरात खूप चाहते आणि हि बातमी या Apple च्या चाहत्यांसाठी तसेच चाहते नसलेल्यांसाठी देखील ही बातमी मजेदार आहे. प्राध्यापक जॉन यांनी १६ फेब्रुवारीला एक ट्विट करून या गोष्टीची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, त्यांना कॉम्प्युटर मिळाल्यावर त्यांनी त्यात एक जुनी गेम डिस्क टाकली. तर कॉम्प्युटर व्यवस्थित काम करत होता.

जॉन असेही म्हणतात की, हा कम्प्युटर ३० वर्ष जुना आहे. ज्यावेळी हा कॉम्पुटर घेतला होता, त्यावेळी ते १० वर्षांचे होते. त्यांनी यात १९७८ मध्ये रिलीज झालेल्या एका गेमची डिस्क टाकली. तसेच त्यांनी सांगितले की, अनेक तास खेळूनही ते या गेमची एक लेव्हलही पूर्ण करू शकत नव्हते.

या कॉम्प्युटरमध्ये जॉन यांना त्यांच्या शाळेच्या काही जुन्या असायन्मेंट सापडल्या. त्यासोबतच त्यांच्या वडिलांचे काही कागदपत्रही दिसले. त्यांनी सांगितले की, त्यावेळी क्लाउड सर्व्हिससारखी काही गोष्ट नव्हती. टेक्नॉलॉजी आजच्यासारखी सोपीही नव्हती. त्यावेळी कॉम्प्युटरमध्ये हार्ड-डिस्क नसायच्या. त्यावेळ फ्लॉपीने काम चालवावं लागतं होतं.

प्रोफेसर जॉनने आपल्या 30 वर्षाच्या ऍपल कॉम्प्यूटर आपल्या मुलांना दाखवल्यांनंतर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. खरंच… 30 वर्ष जुना कंप्युटर, आपल्याला सापडणे आणि तो आता देखील चांगल्या स्थितीत काम करणे म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे.

जॉन यांच्या ३० वर्ष जुन्या कॉम्पुटरचे काही फोटो:

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

 

Leave a Reply