मालिकेत शांत दिसणारी ईशा खर्‍या आयुष्यात नेमकी आहे तरी कशी जाणून घ्या…

काही महिन्यांपूर्वी झी मराठी वाहिनीवर सुरू झालेली मालिका ‘तुला पाहते रे’ आज टी.आर.पीच्या अत्युच्च अर्थात प्रथम स्थानी येऊन पोहोचली आहे. ईशा आणि विक्रांतची जोडी तर सर्वत्रच गाजते आहे.प्रेमाला वय नसतं हे दाखवून देणारी भारतीय टेलीव्हिजनवरील अशी पहिलीच मालिका म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दिवसेंदिवस या मालिकेत घडणाऱ्या घटनांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिखरावर पोहोचली आहे.

ईशा व विक्रांतचे लग्न तर झाले आहे,पण या जोडीची कहाणी पुढे कशी रंगत जाईल हे पाहणे गरजेचे आहे.पण पहिल्यांदाच या मालिकेत प्रमुख भुमीका साकारणारी आणि प्रत्येकाला साधी भोळी वाटणारी ईशा, नेमकी आहे तरी कशी हे आपण जाणून घेवूयात.

ईशा म्हणजे खऱ्या आयुष्यातली गायत्री दातार. गायत्री आपल्या खऱ्या आयुष्यात खुप खट्याळ, बिनधास्त, बोलक्या स्वभावाची आहे. गायत्रीला वेगवेगळ्या विषयांवर तासनतास गप्पा मारणे खूप आवडते. त्याच्यापेक्षाही जास्त वेगवेगळ्या पर्यटन स्थळी फिरायला,आणि ट्रेकिंग करायला तर भयंकर आवडते.

पडद्यावर जरी ती नेहमी स्वतःत गोंधळलेली दिसत असली, तरी ती खऱ्या आयुष्यात किती वेगळी आहे.यावरून तिने भूमिकेला दिलेला प्रामाणिक न्याय दिसून येतो.

गायत्री दातार चे पडद्यावरील पहिले काम असले,तरी तिने आज घराघरात आणि मना मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

गायत्रीच्या पुढील प्रवासाला आणि ईशा आणि विक्रांतच्या जोडीला खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply