गडचिरोलीत भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद

महाराष्ट्र दिनीच दिवशीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा हैदोस सुरू आहे. माओवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे. जांभूळखेडा गावाजवळील ही घटना आहे. या हल्ल्यात 15 जवान शहीद झाल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘नेटवर्क 18 लोकमत’शी संवाद साधताना दिली आहे. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

सकाळी जाळपोळ झालेल्या स्थळापासून जवळच ही घटना घडली आहे. स्फोटात अधिक जवान जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहे. अधिक सुरक्षा दलांच्या तुकड्या येथे पाठवण्यात आल्या आहेत. १ मे महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला आहे. त्यामुळे नक्षलवादी पुन्हा सक्रीय झाल्याची चर्चा आहे.

 

‘ही दुर्दैवी घटना आहे. यावर लवकरच नवीन तंत्रज्ञान आणून नक्षलवाद्यांचा खात्मा केला जाईल. जंगलात कोठेही लपून बसलेल्या नक्षलवाद्यांना शोधून काढलं जाईल १ मेच्या दिवशी पोलिसांची परेड असते. याचाच फायदा घेत त्यांनी हा स्फोट घडवून आणली. पण नक्षलवाद्यांना सोडणार नाही. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. यावर कडक कारवाई करणार.’ अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या हल्ल्यापूर्वी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दानापूरमध्ये माओवाद्यांनी तब्बल 30 वाहने जाळली. या घटनेत 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त अधिक मालमत्तेचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे. माओवाद्यांनी मंगळवारी(30 एप्रिल) रात्री 11 ते 3 वाजण्याच्या सुमारास हे जळीतकांड घडवून आणलं आहे. 

पुराडा पोलीस स्थानकाअंतर्गत येत असलेल्या दादापूर येथून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होतं. या कामावरील ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर यांसह 30 पेक्षा जास्त वाहनं जाळण्यात आली आहेत. तसंच दादापूर येथील डांबर प्लांट, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यालयही माओवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आलं. माओवाद्यांनी केलेल्या या कृत्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, याआधीही माओवाद्यांनी रस्ते तयार करणाऱ्या वाहनांना लक्ष्य केल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आगामी काळात अशी विकासकामं करताना माओवाद्यांकडून होणाऱ्या हिंसक प्रकारांना कसं रोखायचं, याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

वरील माहिती हि NEWS18LOKMAT या वेबसाईट वरून घेणयात आलेली आहे. अधिक माहिती साठी NEWS18LOKMAT ला भेट द्या. याचा Bhannatre.com शी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

 

Leave a Reply