भारतीय सैन्याबाबतच्या या खास गोष्टी, ऐकून तुम्हाला गर्व वाटेल

indian army thumbnail

आपल्याला भारतीय सेनेचा अभिमान आहे. देशाच्या संरक्षणाची प्रत्येक क्षणी भारतीय सेना तयार असते असते. चला जाणून घेऊ भारतीय सेने बद्दलच्या काही गोष्टी ज्यामुळे तुम्हाला भारतीय सेने बदल गर्व वाटेल.

जगातील सर्वात उंच मैदान नियंत्रित करते

सियाचिन ग्लेशियर, समुद्र सपाटीपासून 5000 मीटर उंचीवर आहे आणि आपले भारतीय जवान देशाच्या सुरक्षिततेसाठी नेहमी तैनात असतात. या ठिकाणी बरेच जवान येथील अति कमी तापमानामुळे मृत्युमुखी पडले. येथे बिकट परिस्थितीत सुरक्षा करणे तेवढे सोपे नाही पण आपले जवान ते कार्य चोख पार पडतात.

भारतीय सेना जगातील सर्वात मोठी ‘स्वैछिक सेना’ आहे

indian army

भारतीय सैन्यातले जवान हे खूप देश प्रेमाची भावना बाळगतात. भारतीय संविधानात जबरदस्ती सैन्यात भरती करण्याची तरतूद केलेली आहे, परंतु आजपर्यंत त्या तरतुदीची अंमलबजावणी करायची गरज पडली नाही.

भारतीय सैन्याच्या वॉरफेअर स्कूलने जगात उच्च दर्जा प्राप्त केला आहे

indian army warfare school

जगात, भारतीय सेनेचा हाय अल्टीट्युड वॉरफेयर स्कूल सगळ्यात चांगल्या प्रशिक्षण संस्थांमध्ये गणली जाते. उल्लेखनीय बाब म्हणजे, अफगाणिस्तानात पाठविण्यापूर्वी अमेरिकेची विशेष सैन्य तुकडीचे प्रशिक्षण याच ठिकाणी झाले होते. हे हाय अल्टीट्युड वॉरफेयर स्कूल सैनिकांना डोंगरावर आणि डोंगराळ भागात लढण्यासाठी प्रशिक्षण देते.

सेनेने अणुबॉम्बची चाचणी घेतली आणि CIA ला भनक पण नाही लागली

nuclear test

1974 आणि 1998 मध्ये भारतीय सेनेने अणुबॉम्बची चाचणी घेतली, तरी देखील अमेरिकन गुप्तचर संस्था CIA या चाचणीची भनक पण लागू दिली नाही. हे CIA चं सर्वात मोठं अपयश ठरलं आहे.

भारतीय सैन्यात आरक्षण नाही

fitness test

भारतीय सैन्यात सैनिकांची भरती वेगवेगळ्या चाचण्यांद्वारे, फिटनेसला धरून केली जाते यामध्ये कुठेही आरक्षण नाही.

1971 भारत-पाकिस्तान युद्ध आठवून पाकिस्तानी सैन्य भीतीने कापते

1971 war

1971 च्या युद्धात सुमारे 120 भारतीय सैनिकांनी एक जीप आणि M-40 रायफलसह 2000 पाकिस्तानी सैनिकांविरुद्ध युद्ध केले. संख्येने कमी असले तरी भारतीय सैनिकांनी रणांगण लढविले आणि शेवटी विजयी झाले.

जगातील सर्वात मोठी नागरिक बचाव कार्यांपैकी एक 2013 ‘ऑपरेशन रिलीफ’

उत्तराखंडमधील पूर येऊन गेल्यानंतर, पुरग्रस्थ नागरिकांसाठी भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन रिलीफ’ विषयी योगदानाला आपण परिचित आहोत. जगातील ही सर्वात मोठी नागरीक बचाव मोहीम होती. या मोहिमेत, भारतीय सैन्याने हजारो लोकांना सुरक्षितपणे नेले आणि 3,82,400 किलोची मदत सामग्री नागरिकांपर्यंत पोहचवली.

भारतीय सेने जवळ सर्वात मोठे घोडदळ सैन्य आहे

जगातील तीन देशांपैकी एक भारत आहे, ज्याच्याकडे सर्वात मोठे घोडदळ सैन्य आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

Leave a Reply