‘रस्त्यावर ज्युस विकून CRPF जवान बनवले, दहशतवाद्यांनी मारले’, शहिद रतन ठाकूर यांच्या वडिलांना अश्रू अनावर

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात बिहारचे रतन ठाकूर हे CRPF चे जवान शहिद झाले. जेव्हा ही बातमी त्यांच्या घरच्यांना कळाली तेव्हा त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शहिद रतन ठाकूर यांचे वडील निरंजन ठाकुर यांना तर हि बातमी कळताच मोठा धक्का बसला. मीडिया शी बोलताना त्यांनी सांगितले कि रतन हा माझा एकच मुलगा होता ज्याला मी खूप प्रेमाने वाढवले होते.

माझ्या मुलाला शिकवण्यासाठी मी मोल-मजुरी केली, रस्त्याच्या कडेला बसून जूस विकले, स्टॉल लावून कपडे विकले. पण आता सगळं संपलं, या दहशतवाद्यांनी माझ्या मुलाला ठार मारले.

त्यांनी हे देखील सांगितले कि शहिद रतन ठाकूर के शिक्षणात खूप हुशार होते. ते २०११ ला CRPF मध्ये भरती झाले होते आणि त्यांची पहिली पोस्टिंग गढवा मध्ये झाली होती.

Donate Now

नोकरी मिळाल्यानंतर आमची गरिबी संपली. हळू हळू सगळं बरोबर होत होतं, परिस्तिथी बदलत होती. पण त्याच्या शहिद होण्याने आता आम्ही कोणाच्या आधाराने राहणार. असे शहिद रतन ठाकुर यांचे वडील बोलत होते.

शहिद रतन ठाकूर यांच्या पत्नी राजनंदिनी यांनी सांगितले की, रतन ठाकूर यांचा दुपारी २:३० वाजता फोन आला होता. ते म्हणाले, की मी श्रीनगरला जात आहे. रात्री बोलू. त्यानंतर मी त्यांच्या फोनची वाट बघत राहिले.

दरम्यान, पुलवामामध्ये अतिरेकी हल्ले झाले आहेत अशी बातमी कळाली. आम्ही टीव्ही पाहिल्यावर, हल्ला झाल्याचं कळलं. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्या ऑफिस मधून एक फोन आला कि रतन ठाकूर शहिद झाले आहेत.

शहिद रतन ठाकूर यांची पत्नी गर्भवती असल्याची माहिती त्यांचे वडील निरंजन ठाकूर यांनी दिली. रतन यांच्याही फोन वर बोलत असतानां, ‘मी होळीला घरी येईल’ असे ते म्हणाले होते. शहिद रतन ठाकूर यांना कृष्णा ठाकूर हा चार वर्षाचा मुलगा आहे, ज्याला वडील शहिद झाले असल्याची बातमी अजून सांगितली नाही.

विचारल्यावर, मुलगा म्हणतो की पप्पा ड्युटी वर आहेत. ते जेव्हा येतील तेव्हा येताना मला खेळणी आणतील. त्यांना फोनवर त्याने सांगितले की त्यांनी होळीला येण्यासाठी सुट्टीसाठी विनंती केली.

Leave a Reply