तो मुलींना पळवून न्यायचा आणि नंतर घरी परत आणून सोडायचा, कारण ऐकून बसेल धक्का !

आजकाल जगात महिला आणि मुली किती असुरक्षित आहेत याचा प्रत्यय वेळोवेळी घडणाऱ्या घटनांमधून येतच असतो.त्यामुळेच आपली मुलगी क्षणभरही दिसेनाशी झाली तरी जीव कावरा-बावरा होतो. मात्र या सगळ्याला अपवाद अशी एक घटना घडली आहे. दिल्लीत एक आरोपी मुलींना पळवून नेत होता आणि त्यांना सुखरूप घरीदेखील पोहचवत होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे.

कृष्ण दत्त तिवारी आरोपीने सांगितले की,त्याने कीर्ति नगरमधील आठ वर्षीय मुलीचं अपहरण केलं आणि दुसऱ्या दिवशी तिला सुरक्षित घरी पोहचवले. पोलिसांनी मुलीची चौकशी केल्यानंतर समजले की घराबाहेर एका व्यक्तीनं तिला खेळण्याचं आमिष दाखवतं आपल्या घरी नेलं.यावर पोलिसांनी आरोपीला जाब विचारला असता त्याने जे सांगितलं ते ऐकून पोलिसदेखील चक्रावले.

त्याने सांगितले की आपण या मुलीला कोणतीही हानी पोहचवली नाही तसंच दोन महिन्यांपूर्वीही आपण एका मुलीला पळवून नेवून दुसऱ्या दिवशी तिला घरी पोहचवलं होत.आपल्याला मुलींची आवड आणि मला दोन मुलं आहेत पण मुलगी मात्र नाही त्यामुळे मी या दोन मुलींचं अपहरण केलं !

आरोपीच्या घरच्यांनी जेव्हा या मुली कोण असं विचारलं तेव्हा त्याने सांगितलं होत की ‘त्या आपल्या मित्राच्या मुली असून तो बाहेर गेल्यानं आपण त्यांना घरी आणले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply