या पाच गोष्टी आहेत हृदयासाठी हानिकारक

हृदयाला आरोग्यदायी ठेवण्याकरिता एका चांगल्या जीवनशैलीची गरज असते व हे आजकाल फार अवघड बनले आहे. कधीही झोपणे, उठने, कोणत्याही वेळी काम करणे आणि बाहेरील अन्न खाणे अशी जीवनशैली फक्त शरीराला स्थूलच करत नाही तर त्याला हे मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचवते. खालील पाच गोष्टी खाताना जर काळजी घेतली नाही तर ते हृदयाचे सर्वात मोठे वैरी होतात.

एनर्जी ड्रिंक आणि सोडा

थोडासा थकवा आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला एनर्जी ड्रिंकची आठवण येते परंतु एनर्जी ड्रिंकमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफिन असते. ज्यामुळे हृदयाच्या ठोक्यांचा लयेमध्ये परिवर्तन येण्याचा धोका असतो. याप्रमाणे सोडा पिल्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.सोड्यामुळे आर्टरी वर तनाव येतो व त्यामुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका संभवतो.

चिप्स

मुले असो वा वृद्ध माणसे चिप्स प्रत्येकाला आवडतात परंतु हे तुमच्या आरोग्याकरिता हनिकरक आहे. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की जे लोक एका दिवसात 200 मिलिग्रॅमपेक्षा जास्त सोडियम खातात त्यांच्यामध्ये हृदयाचे आजार होण्याची जास्त शक्यता असते. चिप्समध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम असते. चिप्समध्ये गरजेपेक्षा जास्त मीठ असते जे अनेक विकारांना कारणीभूत असते.

पिझ्झा, नुडल्स आणि चायनीज फुड

पिझ्झा आणि चायनीज फूड हे सोडियमचे जणू घरच आहे. यांच्यासोबत खाण्यात येणार्‍या सॉसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सोडियम असते. या दोघांच्या सेवनाने आर्टरी ब्लॉक होऊ शकते. याप्रमाणेच नूडल्सदेखील हानिकारक असतात. अभ्यासानुसार इन्स्टन्ट नूडल्समध्ये 875 मिलीग्राम सोडियम असते.हि मात्रा फार मोठ्या प्रमाणात आहे.

चिकन

चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते परंतु आज-काल बाजारामध्ये घेतलेले चिकन मिळते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्स फॅट असते हे फक्त आरोग्यासाठी हानिकारक नाहीत तर आपल्या कमरेला जाड बनवण्यामध्ये मोठे योगदान देते. या प्रकारच्या गोष्टी शरीरामध्ये ऑक्सिडेंट नेतात व ते अँटीअक्सिडेंटचे वैरी असतात.

कॉफी

झोप खराब करण्याबरोबरच कॉफी शरीरालाही नुकसान पोहोचवते. यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज व फॅट असतात. यामध्ये साखरही मोठ्या प्रमाणात असते यामुळे ब्लड शुगरची लेव्हल वाढते.

वरील दिलेली माहिती पूर्णपणे बरोबरच असेल असं नाही. ते लेखकाने वयक्तिक अभ्यास करून मांडलेली माहिती आहे. याचा Bhannatre.com शी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

 

Leave a Reply