सुप्रसिद्ध कीर्तनकार बाळू महाराज गिरगावंकर यांचा भीषण अपघात

बातमी: विवेक सिंधु

फाॅर्च्युनरची ट्रॅक्टर ट्राॅलीला धडक; सेलूचे गिरगावकर महाराज गंभीर जखमी..

अपघातात नव्याकोऱ्या फाॅर्च्युनरचा चुराडा

भरधाव वेगातील नवीकोरी फाॅर्च्युनर गाडी ट्रॅक्टर ट्राॅलीवर मागच्या बाजूने धडकून गाडतील तिघे तर ट्रॅक्टरमधील एक गंभीर जखमी झाला. हा अपघात अंबाजोगाई लातूर रोडवर सायगाव येथे आज सोमवारी रात्री ८.३० वाजता झाला. जखमीत सेलू (जि. परभणी) येथील बाळू महाराज गिरगावकर यांचा समावेश आहे.

गिरगावकर महाराज (वय ३७) हे त्यांचे सहकारी आसाराम महाराज वांडेकर (वय ३५) आणि चालक लक्ष्मण त्रिंबक वाघ यांच्यासमवेत लातूरच्या दिशेने निघाले होते. ते सायगाव जवळ आले असता समोर असणाऱ्या ट्रॅक्टर ट्राॅलीला त्यांच्या गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात फाॅर्च्युनर मधील तिघे तर ट्रॅक्टरमधील सय्यद गौस (वय ४०) हा गंभीर जखमी झाला. योगायोगाने अपघातावेळी त्याच ठिकाणाहून प्रवास करणारे अंबाजोगाई राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रणजीत लोमटे आणि त्यांचे सहकारी हसन चाऊस, महेंद्र चोकडा यांनी जखमींना स्वत:च्या गाडीतून तातडीने स्वाराती रूग्णालयात दाखल केले.

सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की नव्याकोऱ्या फाॅर्च्युनर गाडीचा चुराडा झाला आहे. गाडीच्या सर्व एअर बॅग उघडल्याचे दिसून आले.

बाळु महाराज यांची तब्येत ठीक आहे

बाळू महाराज यांची तब्येत चांगली आहे डोळ्याजवल थोडा मार आहे टाके पडले आहेत काळजी नसावी महाराज ड्रायव्हर आणि गायक सर्वजण ठीक आहेत महाराज दर्जिबोरगाव येथे कीर्तनाला जात होते .अपघात नंतर सर्व मदत मिळाली बाळू महारज गिरगावकर दवाखान्यात आहेत.

अपघातात नव्याकोऱ्या फाॅर्च्युनरचा चुराडा:

One Comment

Leave a Reply

Leave a Reply