हे आहे भारतातील सर्वात धोकादायक मंदिर येथे जाण्याचे कोणीही करत नाही धाडस

आपण संकटात असलो आणि सगळे उपाय करून थकलो कि आपल्याला देवाचा आसरा घ्यावा लागतो. आपल्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी यावी आणि आपल्याला मन:शांती लाभावी अशी प्रार्थना करण्यासाठी आपण मंदिरात जातो. मंदिरात गेल्यावर आपल्या मनावरील दडपण कमी होते. परंतु भारतात एक असेही मंदिर आहे जेथे जाण्याचे धाडस सर्वसामान्य माणूस करूच शकत नाही. खरं तर या मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारत्मक शक्ती नाही आणि नकारात्मक शक्ती प्रवेश करण्याचे धाडस देखील करू शकत नाहीत. परंतु या मंदिराविषयी काही गोष्टींमुळे भाविक येथे दर्शनाला येणे टाळतात.

हे मंदिर हिमाचल प्रदेशातील चंबा प्रांतामध्ये भरमोर नावाच्या लहानशा खेडेगावात आहे. हे मंदिर खूप लहान आहे परंतु या मंदिराची ख्याती मात्र सर्वत्र आहे. या मंदिराकडे भाविक दर्शनासाठी येतात, परंतु मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश न करता बाहेरूनच दर्शन घेऊन निघून जातात. हे मंदिर मृत्यूचे देवता यमदेवाचे मंदिर आहे. यमदेवाची मंदिरे भारतात क्वचितच पाहायला मिळतात. भरमोर येथील यम मंदिरामध्ये साक्षात यमदेवाचा वास असून, येथे प्रवेश करण्याची मुभा केवळ यमदेवांनाच असल्याची मान्यता येथे रूढ असल्याने या मंदिरामध्ये प्रवेश करण्याचे धाडस भाविक करीत नाहीत.

स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंदिरामध्ये चित्रगुप्तासाठी देखील एक लहानसा कक्ष बनविण्यात आला आहे. चित्रगुप्त जगातील सर्व मनुष्यांच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशोब ठेवत असल्याची मान्यता रूढ आहे.ही कर्म लक्षात घेता मनुष्याला मृत्युच्या नंतर स्वर्ग प्राप्त होणार की तो नरकात जाणार हे ठरविण्याचा अधिकारही चित्रगुप्ताला आहे, अशी ही समजूत आहे.

भरमोरमधील या यम मंदिरमध्ये चार दरवाजे असून, हे दरवाजे सोने, चांदी, तांबे आणि लोखंड या चार धातूंनी बनविण्यात आले असे म्हटले जाते. ज्या मनुष्यांनी आयुष्यभर वाईट कर्मे केली, त्यांच्या आत्म्याला मृत्युच्या पश्चात लोखंडी दरवाजातून परलोकात पाठविले जाते, तर ज्यांनी आयुष्यभर अनेक पुण्यकर्मे केली, त्यांचे आत्मे सोन्याच्या दरवाजातून परलोकामध्ये पाठविले जात असल्याची आख्यायिका येथे प्रसिद्ध आहे.

टीप: हा लेख मानसी टोकेकर यांनी लिहिलेला आहे. या लेखाचे पूर्ण अधिकार मानसी टोकेकर यांच्याकडे राखीव आहेत. आम्हाला हा लेख आवडला म्हणून आम्ही हा bhannatre.com वर लेखकाच्या प्रदर्शित केला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

Leave a Reply