काय खरंच राहुल गांधी यांच्या जीवाला धोका?

‘काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर स्नायपरनं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला,’ असा दावा काँग्रेसनं केला आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिलं असून चौकशी करण्याची मागणी केली होती. राहुल गांधी सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचा दावा करणारे कोणत्याही प्रकारचे पत्र पक्षाने केंद्रीय गृहमंत्रालयाला लिहले नसल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

या प्रकरणी काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिले असून ते पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रासंदर्भात आता काँग्रेसने नवा खुलासा केला आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षे संदर्भात पक्षाने कोणत्याही प्रकारचे पत्र लिहले नसल्याचे अभिषेक मनु संघवी यांनी स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर दाखवण्यात येणाऱ्या पत्रावर काँग्रेस नेत्यांच्या सह्या आहेत. पण हे पत्र बनावट असल्याचे संघवी यांनी म्हटले आहे. आता या बनावट पत्रा संदर्भात काँग्रेस कारवाई किंवा तक्रार करेल या बद्दल मात्र त्यांनी काहीच सांगितले नाही.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेली सर्वात मोठी घटना आहे. त्यानंतर आता गृह मंत्रालयानं यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये गृह मंत्रालयानं याबाबतची माहिती एसपीजीनं दिली आहे. राहुल गांधी यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. ज्या हिरव्या लाईटबद्दल बोललं जात आहे ती काँग्रेसच्या फोटोग्राफरच्या मोबाईलमधील आहे. शिवाय, काँग्रेसकडून कोणतंही पत्र मिळालं नसल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हणत काँग्रेसनं गृह मंत्रालयाला पत्र लिहिलं होतं. त्यावर आता गृह मंत्रालयानं आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी काँग्रेसनं राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येची देखील आठवण करून दिली.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केरळमधील वायनाडमधून देखील काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेकरता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या राहुल गांधी प्रचारामध्ये व्यस्त आहेत.

राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना चिट्ठी लिहिली होती. काल अमेठी येथील प्रचारादरम्यान राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर हिरवा लेझर लाईट आढळली होती. त्यानंतर गृह मंत्रालयाने एसपीजीच्या डायरेक्टर यांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर किमान सातवेळा ग्रीन लेझर लाईट मारण्यात आल्याचं पत्रात म्हटलं आहे. पुरावा म्हणून काँग्रेसने संबंधित व्हिडिओही सोबत जोडला होता.

विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या सुरक्षे संदर्भात काँग्रेसने कोणतेही पत्र दिले नसल्याचे खुद्द केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यापाठोपाठ आता काँग्रेसने देखील पत्र लिहले नसल्याचे म्हटले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply