पोस्ट मॉर्टम रूममध्ये नेमके काय होते.. सांगितले या कर्मचाऱ्याने

जगातील कोणतेच काम सोपे नसते. मग ते बाजरात जाऊन धान्‍य विकण्‍याचे असो किंवा एसी रूममध्‍ये बसून लॅपटॉपवर केलेले असो. प्रत्‍येक काम करण्‍याच्‍या पद्धती वेगवेगळ्या असतात. काम करण्‍यासाठी अडचणी येतात. काही कामे बौध्‍दीक श्रमाची असतात तर काही कामे शारीरिक श्रमाची असतात. काही लोक आवडीचे काम करतात. मात्र काही कामे असे असतात जे आवडली नाही तरी कर्तव्‍य म्‍हणून करावी लागतात.

आज आम्‍ही तुम्‍हाला अशा व्‍यक्तिची माहिती देणार आहोत जो पोस्‍टमार्टम रूममध्‍ये स्‍वीपरचे काम करतो. चाकू आणि इतर उपकरणांच्‍या माध्‍यमातून अनेक मृतदेहाचे विच्‍छेदन करणा-या व्‍यक्तिला काय वाटत असेल. रोज समोर येणा-या मृतदेहाची चीरफाड केल्‍यानंतर त्‍याचा जगण्‍याकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोण काय होत असेल.

त्‍याच्‍या मनात काय विचार येत असतील. काही लोकांना साधा अपघात पाहिल्‍यांनतर भोवळ येते. मात्र बाबूभाई नावाच्या व्‍य‍क्‍तीने, विचीत्र अपघात झालेले, जाळून घेऊन आत्‍महत्‍या केलेले आणि विष प्राशन करून मृत्‍यूला कवटाळलेल्‍या लोकांचे पोस्‍टर्माटम केले आहे. हे पोस्‍टर्माटम केल्‍यानंतर त्‍यांच्‍या मनात काय विचार आले. त्‍यांना काय वाटले याच्‍या नोंदी बाबुभाईनीं त्‍यांच्‍या डायरीत करून ठेवल्‍या आहेत.

बाबूभाई सांगतात, राजकोटजवळ कोरड्या विहिरीत एका अनोळखी व्‍यक्तीचे प्रेत पडलेले होते. हा माझा पाहिलाच अनुभव होता. पोलिसांनी प्रेत अ‍ॅंबुलन्‍समध्‍ये स्‍ट्रेचरवर टाकून आणले होते. मी कापड बाजूला केले तेव्हा प्रेतावर वेगवेगळ्या अळ्या दिसल्या. धक्कादायक म्‍हणजे प्रेताची मान शरीरापासून वेगळी झालेली होती. मी थरथरत होतो. ते आयुष्‍यातील पहिले पोस्‍टमार्टम होते, जे कधीच विसरू शकत नाही.

काही वर्षापूर्वी कच्‍छजवळ अहमदाबादला जाणा-या लग्‍झरी गाडीचा आपघात झाला. या अपघातात 18 प्रवाशांचा मृत्‍यू झाला. ही 18 प्रेते रूग्‍णालयात आणली. पोस्‍टमार्टम रूममध्‍ये ठेवणे शक्‍य नव्‍हते. यामुळे शवगृहातच पोस्‍टमार्टम करावे लागले. 18 प्रेतांचे पोस्‍टमॉर्टम केल्‍यांनतर शवग्रहातील दृष्‍य पाहण्‍यासारखे नव्‍हते. त्यादिवशी आम्‍ही सर्व सहकारी ना जेवण करू शकलो ना पाणी प्‍यायलो. 

बाबुभाई सांगतात, जेंव्‍हा लहानमुलाचे पोस्‍टमार्टम करण्‍याची वेळ येते तेंव्‍हा होणा-या वेदना शब्‍दात सांगणे शक्‍य नाही. लहान मुलाचे पोस्‍टर्माटम करावे लागते तेव्हा मला स्‍वत:चाच राग येतो. लहानमुलाच्‍या कोवळ्या शरीरावर चाकू चालवताना आपण काय पाप करत आहोत असे विचार सातत्‍याने डोक्‍यात येतात, असे बा‍बूभाई सांगतात. 

बाबूभाई वाघेला यांचे आजोबा आणि वडील पोस्‍टमार्टम करणा-या स्‍वीपर्स काम करत असत. यामुळे मला हे काम करावे लागत असल्‍याचे बाबूभाई सांगतात.

विषारी दारूमुळे किंवा एखाद्या घटनेमध्‍ये कधी 100 तर कधी 50 प्रेत एकत्र आनली जातात. अशा वेळी एका प्रेतावर दूसरे प्रेत ठेऊन पोस्‍टर्माटम करावे लागते असे बाबूभाई सांगतात.

अनेक स्‍वीपर्सना पोस्‍टमार्टम करण्‍याची इच्‍छा नसते. नाव न सांगण्‍याच्‍या अटीवर एका स्‍वीपर्संने दिलेली माहिती अशी की, जळालेल्‍या प्रेताचे पोस्‍टमार्टम अशा प्रकारचे पोस्‍टमार्टम करताना ड्रींक करावीच लागते असे स्‍वीपर्स सांगतात. गुजारातमध्‍ये ड्रींक करणे गुन्‍हा असला तरी अशा परिस्थितीमध्‍ये आमच्‍यावर कारवाई न करण्‍याची दया दाखवतात.

जसदण चे स्‍वीपर जामजीभाई वाघोली सांगतात, मी जेंव्‍हा पहिले पोस्‍टर्माटम केले तेंव्‍हा आजारी पडलो होतो. बरेच दिवस प्रेत माझ्या नजरेसमोर आहे, असा भास मला होत होता.

वरील दिलेली माहिती पूर्णपणे बरोबरच असेल असं नाही. ते लेखकाने वयक्तिक अभ्यास करून मांडलेली माहिती आहे. याचा Bhannatre.com शी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply