माणसे नशेच्या अधीन होतात ,हे सर्वांना ठाऊक आहे ,परंतु आता पक्षीही नशेच्या अधिन होतात ?

माणसे नशेच्या अधीन होतात ,हे सर्वांना ठाऊक आहे ,परंतु आता पक्षीही नशेच्या अधिन होत आहेत, हे सांगितले ,तर तुमचा विश्वास नाही ना बसणार ….? अहो मिठू मिठू करणारा पोपट ,काही दिवसांनी नशेली शीळ घालताना दिसला ,तर नवल वाटुन घेऊ नका. कारण…व्यसन लागलेले हे पोपट सध्या वावरत आहेत राजस्थानात.हे व्यसन दुसरे तिसरे कशाचे नसुन ,आफूचे आहे आफूचे . सध्या राजस्थानातील पोपट ,चक्क आफुच्या नशेच्या आधिन होताना दिसत आहेत.

पोपटांना या अफूच्या नशेने अगदी वेडे केलेआहे ,त्यामुळे आफूच्या बोंडावरील नशेला चीक खाण्यासाठी पडणार्या त्यांच्या धाडीमुळे ,तेथील शेतकरी मात्र हैराण झाले आहेत. राजस्थानात कायदेशीर रित्या अफूची शेती केली जाते.

खसखसीसहित अनेक प्रकारची उत्पादने त्याद्वारे काढली जातात. परंतु याच अफूचे प्रचंड वेड, सध्या तिथल्या पोपटांना लागले आहे. राजस्थानातील मंदसौर जिल्ह्यात अफूची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते . अफूच्या बोंडातील पाझरणार्ऱ्या चिकापासून अनेक उत्पादने घेतली जातात. या अफूच्या बोंडावर चाकू किंवा धारदार वस्तूने चीर दिली जाते. त्यातून हा चीक बाहेर येतो.

तो तसाच ठेवला ,की घट्ट होतो.नंतर तो काढून त्यापासून अनेक उत्पादने बनवली जातात .परंतु राजस्थानातील आफूच्या शेतीत सध्या या चीर दिलेल्या बोंडातुन निघणार्या चीकावर पोपट अक्षरशः तुटून पडत आहेत. त्यामुळे पिकाचे नुकसान तर होत आहेच,परिणामी येथिल शेतकर्यांचेही खुप नुकसान होत आहे.

“नशा ही नाशाला कारणीभूत ठरते ” ही म्हण माणसांसाठी वापरतात. परंतु राजस्थानातील पोपटांना वेडं करणारी ही अफूची ही नशा शेतकर्यांच्या नाशाला कारणीभूत ठरु लागली आहे. या व्यसनामुळे पोपटांचे वैयक्तिक नुकसान होते की नाही ,यापेक्षा राजस्थानातील शेतकऱ्यांचे मात्र अतोनात नुकसान होत आहे, हे नक्की.

तसं पाहिलं ,तर येथील शेतकऱ्यांना या पिकाच्या रक्षणासाठी नेहमीच सतर्क राहावे लागते .कारण अफूची बोंडे तयार होऊ लागली, की चोरांचा उपद्रवही वाढतो. परंतु, यंदा तर या चोरांपेक्षाही, पोपटधाडीचे भय शेतकऱ्यांना जास्त वाटू लागले आहे.

आफूच्या पिकाचे व्यसन लागलेल्या या पोपटांना, आफूच्या पिकापासून दूर ठेवण्यासाठी,शेतावर रात्रभर राखण करण्यापासुन,अनेक प्रकारचे उपाय शोधुन काढण्याच्या प्रयत्नात सध्या इथले शेतकरी दिसत आहेत… शेवटी कुणालाही लागलेले व्यसन त्रासदायकच ठरत असते हे नक्की…मग भले ते माणसाना लागलेले असो, वा राजस्थानातील या आफूवेड्या पोपटांना लागलेले………!!!!

Leave a Reply