या तारखेला झालाय तुमचा जन्म, तर हे करियर ऑप्शन्स कधीच निवडू नका,अन्यथा आयुष्य गरिबीत घालवाल !

अंकशास्त्रानुसार धन मिळण्याचा अंक अंकशास्त्रानुसार 4 हा अंक धनाचा मानला जातो आणि 1 हा अंक नेतृत्वाचा मानला जातो. यामुळे ज्या कुणा व्यक्तीचा जन्म 4,13,22 किंवा 31 या तारखेला झाला आहे ते मूल्यांक 4 च्या अंतर्गत येतात. त्यामुळे पैशांच्या बाबतीत ते सदैव संपन्न असतात. असं म्हंटलं जातं की हा मूल्यांक असलेल्या व्यक्तींच्या डोक्यावर लक्ष्मीचा हात असतो. त्यामुळे हे जिथे कुठे असतात तिथे धनाची कमतरता नसते.

मूल्यांक 1 यापेक्षा बरोबर विरुद्ध मूल्यांक 1 (1,10,19 आणि 28 तारखेला जन्मलेले लोक) च्या अंतर्गत येणारे जातक सूर्यापासून प्रभावित असतात. आणि त्यांच्यात अद्भुत नेतृत्व क्षमता असते. कौटुंबिक पातळीवर यांची आर्थिक स्थिती मजबूत नसली तरी भविष्यात आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर राजकारण आणि व्यापारात विशेष यश संपादित करतात.

अयशस्वी होण्याचं कारण4 या अंकाच्या मूळ आधाराला लक्षात घेऊन अंकशास्त्र यांना व्यापार करण्याची परवानगी देत नाही. अंक विज्ञानानुसार यांच्यात आत्मविश्वास कमी असतो. त्याचकारणाने योग्य वेळी योग्य निर्णय त्यांना घेता येत नाहीत. भावनात्मकदृष्ट्या देखील ते खूप कमकुवत असतात. यांची निर्णयक्षमता फारच कमजोर असल्याने एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवताना यांना फार विचार करावा लागतो. मात्र असं करून देखील ते आपल्या विश्वासास पत्र असलेली माणसं शोधणं शक्य होत नाही.

अनिल अंबानी कुटुंबअंक 1 आणि 4 या जातकांचं व्यवसायात यश किंवा अपयश मिळविण्यासाठी अनिल अंबानी यांच्या कुटुंबाचं उदाहरण पुरेसं आहे. एक मोठ्या व्यवसायिकाचा मुलगा असताना देखील अनिल अंबानींना हवं तेवढं यश संपादित करता आलं नाही. तर दुसरीकडे त्यांचेच मोठे बंधू मुकेश अंबानी देशाचे सर्वात मोठे व्यावसायिक आहेत.यांच्या जन्मतारखेचा अभ्यास केल्यानंतर मूल्यांक 1 आणि 4 ची खरी स्तिथी समोर येते. धीरुभाई अंबानी ( 28/12/1932) आणि मुकेश अंबानी (19/04/1957) मूल्यांक 1 च्या अंतर्गत येतात. तर अनिल अंबानी (04.04.1959) मूल्यांक 4 च्या अंतर्गत येतात.

सायरस मिस्त्री नव्यानेच टाटा ग्रुप चे नवीन चेअरमन झालेल्या आणि काही दिवसांतच पदाचा राजीनामा देणारे सायरस मिस्त्री चांगलेच चर्चेत होते. हे सुद्धा जातक 4 च्या अपयशाचं मोठं उदाहरण म्हणावं लागेल. साइरस मिस्त्री मूल्यांक 4 (04.07.1966) चे आहेत.

भारताच्या टॉप 10 व्यावसायिकांमध्ये अधिक प्रमाणात मूल्यांक 1 आणि 5 या व्यक्ती आहेत. यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुकेश अंबानी तसेच टाटा ग्रुपचे पूर्व चेअरमन रतन टाटा (28.1.1937),सन फार्माचे चेअरमन दिलीप सांगवी(01.10.1955), हिंदुजा ग्रुपचे चेअरमन एस.पी.हिंदुजा (28.11.1935) यांचा देखील समावेश आहे. जगातील यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जाणारे बिल गेट्स सुद्धा (28.10.1955) मूल्यांक 1 चे आहेत.

मूल्यांक 5 चे यशस्वी उद्योजक मूल्यांक 5 असलेल्या यशस्वी उद्योजकांमध्ये भारतातील काही मोठ्या उद्योजकांचाही समावेश आहे. यात भारती एंटरप्राइजेसचे चेयरमैन आणि ग्रुप सीईओ सुनील मित्तल(23.10.1957), एचसीएलचे चेअरमन शिव नादर (14.07.1945) यांची नावं प्रामुख्याने घेतली जातात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.