पुलवामा हल्ल्यावर आपल्या सर्वांच्या भावना आणि प्रश्न मांडणारा छोटासा लेख…

नमस्कार,
मी शुभम दिपकराव सुर्यवंशी,

पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या भ्याड हल्ल्यावर आपल्या सर्वांच्या भावना आणि प्रश्न मांडणारा माझा छोटासा लेख…..

🇮🇳 जरा याद करो कूर्बानी🇮🇳

मृत्यू एवढाही सोपा नसतो, जेवढा जवानांच्या वाटेला येतो.. त्यांचेही स्वप्ने असतात, त्यांनाही आई-वडील,बायको- पोरं, घर-दार असतेच..

काय म्हणत असेल त्या आईचं काळीज जिच्या मुलाची उंची एक इंचभर जरी कमी असती तर त्या मुलाला भारतीय सैन्य दलात कार्यरत होण्यापासून अधिकार्यांनी रोखले असते, पण आज ती आई तिच्या मुलाचं तिरंगा लपेटून आलेल अर्ध शरीर जड अंतःकरणाने स्विकारूनही तिच्या मुलाच शेवटच दर्शनही त्या मातेच्या नशिबी नाही…

भारत मातेच्या आत्म्यावर विखुरलेले शरीराचे अवशेष, अंगावरच्या कपड्यांचे आणि जवानांनी भरलेल्या बसचे छिन्नविछिन्न झालेले तुकडे, रक्ताने माखलेला रस्ता अन त्याच रस्त्यावर इतरस्त पडलेले माझ्या भारत मातेच्या वीर अमर जवानांच्या शरीराचे लचके….

यात कोणी 50 दिवसाच्या सुट्टीनंतर परतलेला मित्र, तर कोणी डिसेंबर(2018) महिन्यात जन्मलेल्या स्वतःच्या मुलीला बघायच स्वप्न उराशी बाळगून सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी जाणारा बाप, तर कोणी 7 महिन्याआधीच आपला धाकटा मुलगा अपघाताने गमवलेल्या माता-पित्याचा मोठा मुलगा, कोणी नवीन संसार थाटायच स्वप्न अधुरे ठेवून लग्नाच्या एक महीना अगोदरच अमर झालेला तरूण जवान आणि एक तो जो आपल्या कॅन्सर ग्रस्त आईची काळजी न करता भारत मातेसाठी वीर मरण पत्करून आईला आजारपणात सोडून गेलेला मुलगा…..

गमवणार्यांनी गमवले पण याचे चटके संपुर्ण भारतीयाना लागलेत….म्हणून हा विषय राजकारणाने आरोप-प्रत्यारोप करून ,निषेध आणि बंद पाळुन, आंदोलन करून, जाळपोळ आणि दगडफेक करून किंवा रास्ता रोको, रेल्वे आडवुन निषेध नोंदवत आपण आपल्या देशाचेच आर्थिक नुकसान करायची ही वेळ नाही.

यामुळे आपल्या देशाचेच नुकसान होते. तर याउलट सैन्य दल आणि त्यांच्या परिवाराच्या आणि जम्मू-काश्मीरच्या पाठीशी एकात्मतेने उभे राहून त्या भ्याड, निच कृत्य करणार्या लाचार पाकड्यांचा नामोनिशान मिटविण्यासाठी एकजूट होण्याची ही खरी वेळ आहे .

मोदीजी तुम्हीच भारताच्या इतिहासातील पहिली सर्जिकल स्ट्राईक घडवून उरी येथे झालेल्या पाकच्या नापाक कृत्याचे चोख प्रत्युत्तर दिले आणि आता भारतीय जनतेच्या तुमच्या कडून अपेक्षा उंचावल्या आहेत. हीच वेळ आहे नापाक देशाचा नामोनिशान मिटविण्याची.

हिच ठरेल शहीद वीर जवानांना श्रद्धांजली, हाच होईल खरा निषेध, हाच असेल कायमचे रोको आणि आंदोलने, होय होय खरा बदला हाच असु शकतो…. भारतवासियांचा एकच आवाज आहे रोजगार नाही मिळालेला चालेल, खात्यात 15 लाख नाही आले चालेल, एवढंच काय तर वीर जवानांच्या परिवाराला देण्यात येणारी भरपाई काही काळ थांबवली तरी चालेल कारण “खुन का बदला खुन से नहीं, पाकिस्तान का नामोनिशान मिटानेसेही ब्याज के साथ परिवारोंको भरपाई मिलेगी”.

आता होईल का बदला सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबांचा ?
दिले जाईल का सडेतोड उत्तर भ्याड हल्ल्याचे?
पुन्हा सर्जिकल स्ट्राईक की पाक चा नामोनिशान मिटणार?
URI चित्रपटाचा URI-2, URI-3 भाग निघतील की “एक था पाकिस्तान” चित्रपटाची निर्मिती लवकरच होणार सुरू?
भारतीय नागरिकांना असे खुप काही प्रश्न पडलेच असतील, तेच प्रश्न मी माझ्या या लेखातून मांडायचा प्रयत्न केलाय.
धन्यवाद……

#SupportToIndianArmy

— शुभम सुर्यवंशी.
Facebook

 

Leave a Reply