पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका!

पुलवामा हल्ल्यात दहशतवाद्यांनी 200 किलो स्फोटकं वापरली त्याच 200 किलोचा बदला भारतानं घेण्यास सुरुवात केला आहे. पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या सगळ्या वस्तूंवर भारतानं थेट 200 टक्के आयातशुल्क लादलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला भारतात व्यापार करणं कठिण होणार आहे, या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

ही वाढ त्वरित लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कांदा, साखर, मसाल्याचे पदार्थ यांवरची कस्टम ड्युटी वाढण्याची चिन्हं आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी ट्विट करून दिली आहे.

भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढण्यावरच न थांबता सरकारनं आता पुढची पावलं उचलली आहेत. पाकिस्तानच्या मर्चंट नेव्हीची जहाजं इंधन भरण्यासाठी मुंबई आणि तिरुअनंतपुरंच्या बंदरात येतात.

जर भारतानं त्यांची ती सुविधा बंद केली, पाकिस्तानी व्यापारी जहाजांनी लांबपल्ल्याचा प्रवास करणं सोपं राहणार नाही.

आजही अवजड कार्गोसाठी जलमार्ग हाच परवडणारा मार्ग असतो. तिच सोय गेली तर पाकिस्तानच्या व्यापार बुडू शकतो.

त्याचप्रमाणे पाकिस्तानी विमानसेवांना भारतीय अवकाशातून उड्डाणास बंदी केली तर आणखी मोठा दणका बसेल, असंही जाणकारांचं मत आहे.

गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला टार्गेट केले.  लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी मार्गावर स्फोट घडवला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधूंद गोळीबार केला. यात 40 जवान शहीद झाले आहेत. तर 20 पेक्षा अधिक जवान जखमी झाले आहेत.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत.

आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे.

जम्मू काश्मीरमधील पुलवामाच्या अवंतीपुरा भागात लष्करी जवानांवर हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे.  या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचं ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे. दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेला हा भ्याड हल्ला आहे. मी याचा निषेध करतो, जवानांचे हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही.

One Comment

Leave a Reply

Leave a Reply